शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रामदासपेठेत रोजच वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

बजाजनगर ते लोकमत चौक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा नागपूर : बजाजनगर चौकाकडून लोकमत चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी ...

बजाजनगर ते लोकमत चौक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

नागपूर : बजाजनगर चौकाकडून लोकमत चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे चांगलाच खोळंबा झाला.

शहराचे मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदासपेठ व धंतोली परिसरात वाहनांच्या पार्किंगची भीषण समस्या आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांचे वाहन रामदासपेठ, धंतोली परिसरात जागोजागी पार्क झालेले बघायला मिळतात. या परिसरात पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. लोकमत चौक ते बजाजनगर दरम्यानच्या रोडवर दवाखाने, हॉटेल्स आहेत. या रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केले जाते. पायी चालणाऱ्यांसाठी असलेला फुटपाथही पार्क झालेल्या वाहनांच्या कचाट्यात येतो. मुख्य रस्ताच नाही, तर रामदासपेठ व धंतोलीतील गल्लीबोळीतसुद्धा चारचाकी वाहनांची पार्किंग केले जाते. वाहतूक विभागाचे कर्मचारी परिसरात नो पार्किंगची कारवाई करतात. तरीसुद्धा वाहने पार्क केली जातात. मंगळवारी दुपारी लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही चौकात वाहतूक कर्मचारी दिसून आला नाही. ही वाहतूक सुरळीत व्हायला किमान तासभराचा वेळ लागला. या परिसरांमध्ये होणारी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अ‍ॅम्ब्युलन्सचे आवाज, वाहनांची वर्दळीमुळे येथील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.