शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या ३०० नमुन्यांची दररोज तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

पाण्याच्या ३०० नमुन्यांची दररोज तपासणी दूषित घटक तपासून काढले जातात - दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

पाण्याच्या ३०० नमुन्यांची दररोज तपासणी

दूषित घटक तपासून काढले जातात - दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराच्या विकासासोबतच शहराची लोकसंख्या वाढत आहे. याचा भार महापालिकच्या मूलभूत सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे आजार होण्याचा धोका असल्याने शहरातील २५ लाख नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनपाच्या जलप्रदाय विभागातर्फे सर्व झोनमधून दररोज पाण्याचे ३०० नमुने घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या प्रयोगशाळेत त्यातील दूषित घटक तपासले जातात.

नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० ते ६५० एमएलडी पाणीपुरवठा होत असून प्रति माणसी १५० लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहरालगतच्या नेटवर्क नसलेल्या भागत टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अधिक असते. याचा विचार करता सर्व भागात पाणीपुरवठा व्हावा यासाठी ६३ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. अमृत योजनेतून लवकरच २३ जलकुंभ पुन्हा उभारले जाणार आहेत. शहरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाच जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत.

....

बॉक्स...

महापालिकेच्या दहा झोन क्षेत्रातील वेगवेगळ्या भागातून दररोज ३०० पाणी नमुने तपासणीसाठी गोळा केले जातात. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील बॅक्टेरिया व दूषित घटक तपासले जातात. तसेच नागरिकांची दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार असल्यास झोन स्तरावर दखल घेऊन पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.

.....

नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा

नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनपाच्या सर्व झोनमधून दररोज ३०० नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासले जातात.

डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता,सा.आ.अभियांत्रिकी मनपा

.....

शहराची लोकसंख्या -२५ लाख

प्रती माणसी दररोज पाणीपुरवठा -१५० लिटर

पाणी वितरणासाठीच्या टाक्या -६३

जलशुद्धीकरण केंद्र -५

दररोज तपासण्यात येणारे पाणी नमुने -३००

....