शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

बिल्डरला ग्राहक न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 02:40 IST

त्रिमूर्तीनगर पठाण ले-आऊट येथील रहिवासी फ्लॅटधारक जयवंत नलोडे यांना १२ लाख रुपये व्याजासह

१२ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश : फ्लॅट बनविताना नकाशात केला बदल नागपूर : त्रिमूर्तीनगर पठाण ले-आऊट येथील रहिवासी फ्लॅटधारक जयवंत नलोडे यांना १२ लाख रुपये व्याजासह तसेच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासापोटी २५ हजार रुपये मानकापूर सादिकाबाद येथील प्रभू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक प्रमोद मिश्रा यांनी द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य नितीन घरडे आणि चंद्रिका बैस यांनी दिला. प्रकरण असे की, नलोडे हे मोरारजी टेक्स्टाईल्समध्ये नोकरी करतात. त्यांनी घर विकत घेण्याचा विचार करून आयडीबीआय बँकमार्फत १४ सप्टेंबर २००५ रोजी १२ लाख रुपये घेण्याचे ठरवले होते. त्यांनी बिल्डर मिश्रा यांच्या प्रभू ब्रह्मा अपार्टमेंट मध्ये ३०२ क्रमांकाचा फ्लॅट आरक्षित केला होता. या फ्लॅटबाबतचे कागदपत्र आणि नकाशा बिल्डरने नलोडे यांना दिला होता. प्रत्यक्ष फ्लॅट बनविताना बिल्डरने मोठ्या प्रमाणावर फेरफार केला होता. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्याबाबतचे हप्ते नलोडे यांच्या खात्यातून वजा केले जात होते. संपूर्ण रक्कम वसूल करूनही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नव्हता. शिवाय पैसेही परत केले जात नव्हते. यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. नलोडे यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करताच त्यावर सुनावणी होऊन बिल्डरने तक्रारकर्त्यास रक्कम घेतल्यापासून १२ लाख रुपये दरसाल दर शेकडा १२ टक्के व्याज दराने द्यावे, झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासापोटी २५ हजार व तक्रारीचा खर्च ५ हजार द्यावे, असे मंचाने आपल्या आदेशात नमूद केले. मंचपुढे तक्रारकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. विलास डोंगरे, अ‍ॅड. ज्योती डोंगरे तर बिल्डरच्या वतीने अ‍ॅड. राकेश द्विवेदी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)