शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

एक सीटी स्कॅन केवळ ४ ते ५ एक्स-रे समान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

मेहा शर्मा नागपूर : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ़ रणदीप गुलेरिया यांनी एक सीटी स्कॅन ...

मेहा शर्मा

नागपूर : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ़ रणदीप गुलेरिया यांनी एक सीटी स्कॅन ३०० ते ४०० एक्स-रे समान असल्याची माहिती देऊन सौम्य कोरोना असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन टाळण्याचा सल्ला दिला होता़ दि इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनने डॉ़ गुलेरिया यांचा हा दावा अमान्य केला आहे़ सध्या उच्च व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपकरणे उपलब्ध असल्यामुळे डॉ़ गुलेरिया यांचा दावा निरर्थक असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे़ असोसिएशननुसार एक सीटी स्कॅन केवळ ४ ते ५ एक्स-रे समान आहे़

डॉ़ गुलेरिया यांनी दिलेली माहिती वर्तमान विज्ञानाशी सुसंगत नाही़ त्यांनी केलेल्या दाव्याएवढे रेडिएशन वाईट नाही़ सीटी स्कॅनमुळे कर्करोग होतो, असे म्हणणे अयोग्य आहे़ एचआर-सीटी काळाची गरज आहे़ सीटी स्कॅनमुळे रुग्णाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो याचे पुरावे उपलब्ध नाही, असे रेडिओलॉजिस्ट डॉ़ राजू खंडेलवाल यांनी सांगितले़

मेडिकलच्या रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ़ आरती आनंद यांनी डॉ़ गुलेरिया यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असावा, असे मत व्यक्त केले़ सीटी स्कॅन खूप जास्त वाईट नाही़ एचआर-सीटी नेहमी करावे लागत नाही़ कोरोना रुग्णांनी पहिल्या पाच दिवसात एचआर-सीटी करू नये़ कोरोना लक्षणे असताना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यास एचआर-सीटी तातडीने करावे़ दुसऱ्यांदा सीटी करणे परिस्थितीवर अवलंबून आहे, अशी माहिती त्यांनी दिली़

रेडिओलॉजिस्ट डॉ़ जितेंद्र साहू यांनीही डॉ़ गुलेरिया यांची माहिती चुकीची असल्याचे नमूद केले़ नवीन उपकरणांचे रेडिएशन कमी असते़ रुग्णाला एचआर-सीटी यंत्रात केवळ ३०-३५ सेकंद थांबावे लागते़ वर्तमान काळात रेडिएशन कमी होते़ फुफ्फुसाची अवस्था तपासण्यासाठी एचआर-सीटी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले़

रेडिओलॉजिस्ट डॉ़ रवी राजदेव यांनी ३०-४० वर्षांपूर्वीची यंत्रे धोकादायक होती, याकडे लक्ष वेधले़ आता कमी रेडिएशनचे स्कॅनर वापरले जातात़ रेडिएशन रुग्णाच्या शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते़ लठ्ठ रुग्णासाठी जास्त रेडिएशन वापरले जाते़ कमाल रेडिएशनमध्ये एक एचआर-सीटी ४ ते ६ एक्स-रे समान आहे़ एका सीटी स्कॅनमुळे कर्करोग होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले़