शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सीआरपीएफचे डीआयजी लाठकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल

By admin | Updated: August 15, 2015 03:03 IST

गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संजय लाठकर यांच्यासह ...

नागपूर : गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संजय लाठकर यांच्यासह नागपुरातील चार आणि ग्रामीणमधील एका पोलीस अधिकाऱ्याला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘पोलीस मेडल‘ जाहीर करण्यात आले. सुरक्षा दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधितांना राष्ट्रपतींद्वारे स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक बहाल करण्यात येतात. आयपीएस बिहार कॅडर असलेले संजय लाठकर मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. उच्च विद्या विभूषित लाठकर यांनी प्रारंभी बीई सिव्हील केल्यानंतर आयआयटी पवईतून एमटेक (एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर १९९५ ला ते सरळ सेवा भरतीने भारतीय पोलीस दलात रुजू झाले. रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात त्यांना पहिली नियुक्ती मिळाली. त्यांंनी येथे दोन वर्षात अनेक धाडसी कारवाया करून रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांची दाणादाण उडवली. परिणामी त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी दोनवेळा प्राणघातक हल्ले चढवले. एका वेळच्या हल्ल्यात लाठकर यांना मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांनी गराडा घातला होता. अशा वेळी जीवाची पर्वा न करता लाठकर यांनी नक्षलवाद्यांशी आमनेसामने लढत देऊन दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले तर, इतरांना पळून जाण्यास बाध्य केले. या जिगरबाज कामगिरीमुळे लाठकर यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते. लाठकर सध्या नागपूर आणि गडचिरोली विभागाचे सीआरपीएफचे डीआयजी म्हणून प्रतिनियुक्तीवर सेवा देत असून, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच गडचिरोलीतील नक्षलवादी कारवायांना लगाम बसलेला आहे. २० वर्षांच्या सेवेत त्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल दोन वेळा शौर्यपदक, म. गांधी शांतता पुरस्कार आणि ५५ वेळा प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सीआरपीएफने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बजावलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता लाठकर यांना राष्ट्रपतींद्वारे देण्यात येणारे ‘पोलीस पदक‘ जाहीर करण्यात आले. एकीकडे असे कर्तव्यकठोर असलेले लाठकर सीआरपीएफच्या जवानांसाठी मायाळू पालक म्हणूनही ओळखले जातात. (प्रतिनिधी)यांनाही मिळाले पदकंसीबीआयच्या स्थानिक युनिटमधील डीवायएसपी त्रियाग रंजन श्रीधरन्, शहर पोलीस दलातील विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक ईश्वर किनकर, खापरखेडा (नागपूर ग्रामीण) पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक रामआसरे मिश्रा आणि सीआरपीएफ २१३ लेडीज बटालियनच्या सहायक उपनिरीक्षक कल्पना शहा यांनासुद्धा उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे.