शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवेसाठी सीआरपीफ सज्ज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारकडून नागरी उपाययोजनेसाठी सीआरपीएफला निधी मिळतो. या निधीचा वापर करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. सीएरपीएफच्या ...

नागपूर : केंद्र सरकारकडून नागरी उपाययोजनेसाठी सीआरपीएफला निधी मिळतो. या निधीचा वापर करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. सीएरपीएफच्या कम्पोजिट हॉस्पिटलची (सीएच) संख्या वाढविण्यात आली आहे. हॉस्पिटल अपग्रेड करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. जनसेवेसाठी सीआरपीएफ सज्ज आहे, असे महाराष्ट्र, गोवा व गुजरातच्या (पश्चिम सेक्टर) केंद्रीय राखी‌व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी सांगितले.

रणदीप दत्ता यांनी हिंगणा येथील ग्रुप केंद्राचे सोमवारी निरीक्षण केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी नवीन भरती करण्यात आलेल्या ४१८ जवानांना उत्कृष्ट प्रशिक्षण देणे आमची प्राथमिकता आहे. ग्रुप केंद्राद्वारे यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आले. केंद्राच्या परिसरात त्यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. त्यांनी जवानांशी संवाद साधत मनोबल वाढविले. त्यानंतर ग्रुप केंद्राअंतर्गत को-ऑपरेटिव्ह शॉप, हॉट स्प्रिंग मेस, खेलगाव आदी कार्यालयांचे निरीक्षण केले.

यावेळी त्यांच्यासोबत नागपूर ग्रुप केंद्राचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, एसटीसी कमांडेंट सुभाषचंद्र, डीआयजी लोकेंद्र सिंह, संतोषकुमार मिश्रा, कमांडेंट करुणा रॉय, उप कमांडेंट विजय सिंह, सहायक कमांडेंट राहुल भशारकर, संकल्प मिश्रा, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी, कंपोजिट रुग्णालय व २१३ महिला बटालियनचे अन्य अधिकारी उपस्थित होते. नागपूर केंद्राचे निरीक्षण केल्यानंतर ते गडचिरोलीकडे रवाना झाले.