शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

क्राईम ग्राफ घसरला

By admin | Updated: July 13, 2016 03:27 IST

जवळपास सर्वच मोठे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यातील गुंडांवर मोक्कासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारीला

पोलीस आयुक्त : शहरातील गुन्हेगारीला लगाम नागपूर : जवळपास सर्वच मोठे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यातील गुंडांवर मोक्कासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे नागपूर पोलिसांनी प्रयत्न केले. त्याचमुळे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना यश मिळाले असे सांगून खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी वसुली, हाणामाऱ्या यासारखे गंभीर गुन्हे गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी केला. ठाणेदारांची मासिक गुन्हेआढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. जनतेच्या मनात आपण सुरक्षित आहोत, ही भावना रुजविण्यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार नोंदवून त्याला न्याय देण्यात येईल. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात हयगय होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारी निपटून काढतानाच महिलांच्या भावनिकतेशी जुळलेल्या चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही पोलिसांनी यश मिळवले आहे. मात्र, पोलीस येथे थांबणार नाहीत. चेनस्रॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व ठाण्यांना देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यादव म्हणाले. शहर पोलीस दलात अधिकाऱ्यांची कमतरता नसल्याने आता अधिक प्रभावीपणे काम करण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. अनेक मोक्का प्रकरणात गुन्हेगारांना जामीन मिळाला एवढेच नव्हे तर कोर्टाकडून फटकारही मिळाल्याची बाब पत्रकारांनी उपस्थित केली. त्यावर बोलताना, कोर्टाच्या आदेशावर भाष्य करता येणार नाही, असे ते म्हणाले. गुन्हेगारांवर मोक्का लावणे, त्यासंबंधाने भक्कम पुरावे गोळा करणे आणि शिक्षा होईल, असे प्रयत्न करणे हे पोलिसांचे काम आहे. या प्रक्रियेत कसलीही त्रुटी राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे यादव म्हणाले. डब्बा ट्रेडिंग प्रकरणात पोलिसांना सूर गवसला नसल्याची सर्वत्र चर्चा असल्याकडे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, या प्रकरणात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कचे क्लोनिंग करण्यात आले. त्याचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल कधी येणार, हे पोलिसांच्या हातात नाही. तो लवकर मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त म्हणाले. डब्बाप्रकरणात अनेकजण जुळले असल्याचे सांगितले गेले होते. तथापि, पहिल्या दिवशी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली नाही, असा प्रश्न केला असता, हार्डडिस्कचा तज्ज्ञांकडून अहवाल मिळाल्यानंतर अनेक धक्कादायक घडामोडी अपेक्षित असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. या प्रकरणाच्या तपासाला दोन महिने झाले तरी रवी अग्रवाल आणि अन्य मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही, असाही प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, त्यांचा कसोशीने शोध घेतला जात आहे.