वाणिज्य .. १० बाय २ ...
नागपूर : कॅन्सर रिलीफ सोसायटीद्वारे संचालित राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलच्या डे केअर किमो वार्डाचे उद्घाटन उर्मिला अग्रवाल आणि आरसी प्लास्टो टँक अॅण्ड पाईप्स प्रा.लि. नागपूरचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या शुभहस्ते झाले. विशाल अग्रवाल यांचे वडील प्रतिष्ठित उद्योजक आणि समाजसेवक रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डे केअर वाॅर्डाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक कृपलानी, सहसचिव रणधीर झवेरी, कोषाध्यक्ष अवतराम चावला, सदस्य डॉ. रामकृष्ण छग्गानी, अतिरिक्त संचालक डॉ. प्रकाश वाकोडे, रेडिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. कर्तार सिंग, वरिष्ठ सल्लागार डॉ. अंजली कोल्हे, सल्लागार डॉ. उमाकांत पाछेल व डॉ. प्रशांत ढोके, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. रश्मी राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतनकुमार भोला आणि कुणाल राऊत, नीलेश गंधारे व इतर कर्मचारी उपस्थित होते. (वा.प्र.)