शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:27 IST

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देवकिलांना इंग्रजी शिकून घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली उच्च न्यायालयाच्या सभागृहामध्ये ही मुलाखत घेण्यात आली. एका प्रश्नाचे उत्तर देताना न्या. देशपांडे यांनी न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यायालयाचे कामकाज मराठीमध्ये केले जाऊ शकत नाही. तसे करणे प्रत्येकासाठी गैरसोयीचे होईल. एखाद्यास काही बाबतीत इंग्रजीमध्ये बोलणेअवघड वाटल्यास त्याला मराठी भाषा वापरण्याची परवानगी दिली जाते. परंतु, पूर्णपणे मराठीमध्ये कामकाज करणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले.वकिलीपेक्षा न्यायदानाचे कार्य करणे कठीण आहे. न्यायदान करताना दोन्ही बाजूने समन्वय ठेवावा लागतो. सुनावणीमध्ये पुढे न आलेली महत्त्वाची बाजू तपासून पहावी लागते. न्यायदानावर न्यायमूर्तींच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचाही फार मोठा परिणाम पडतो. वकिलांनी स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी आग्रही न राहता स्वत:ची कामगिरी कशी गुणवत्तापूर्ण होईल यावर जास्त भर द्यायला पाहिजे. स्वत:ची कामगिरी उच्च दर्जाची राहिल्यास निकाल आपोआप आपल्या बाजूने लागतो. वकिलांनी नेहमी सर्वप्रथम पक्षकारांची व्यथा समजून घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे कशी मांडायची यावर परिश्रम घ्यावे अशी सूचना न्या. देशपांडे यांनी केली.लहानपणी शिक्षणात मुळीच रुची नव्हती. शिक्षणबाह्य बाबींवर जास्त भर देत होतो. त्यामुळे शिक्षणात गती नव्हती. इयत्ता तिसरीमध्ये नापास झालो होतो. शालेय शिक्षण मराठीत झाले. परिणामी, पुढे चालून इंग्रजीची मोठी समस्या उभी राहिली. त्यावर परिश्रमाने मात करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. वकिली व्यवसायात आल्यानंतर इतर सर्व गोष्टी बाजूला पडल्या. स्वत:ला पूर्णपणे वकिली व्यवसायात झोकून दिले. २५ वर्षे वकिली केल्यानंतर न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. तेव्हापर्यंत न्यायमूर्ती होण्याचा विचार मनात आला नव्हता अशी माहिती न्या. देशपांडे यांनी यावेळी दिली. त्यांचे बालमित्र अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी मुलाखतीचे संचालन केले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नागपूरने घडविलेआपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व येथील सहकाऱ्यांनी घडविले. आपल्या यशामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे. मुंबई व औरंगाबाद येथील लोकांनी कितीही प्रशंसा केली तरी, कार्य करण्याचे खरे समाधान नागपूर खंडपीठातच आहे. आपल्या लोकांसोबत काम करण्यामध्ये नेहमीच आनंद वाटतो अशा भावना न्या. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarathiमराठी