शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

देशाला योग्य वैद्यकीय सेवांची गरज

By admin | Updated: August 11, 2014 00:55 IST

वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. दरम्यानच्या काळात याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन समोर येत आहे. अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन

अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस : पदग्रहण सोहळा थाटातनागपूर : वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. दरम्यानच्या काळात याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन समोर येत आहे. अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन होत आहे. यूकेमध्ये वैद्यकीय क्षेत्राचा जेवढा विकास झाला आहे, तेवढाच विकास आपल्या देशातही झाला आहे; असे असले तरी योग्य प्रकारच्या वैद्यकीय सेवांची गरज मोठ्या प्रमाणात आहे, असे विचार कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट (यूके) डॉ. संजीव पेटकर यांनी मांडले.अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेसचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सेंटर पॉर्इंट हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ‘यशदा’चे महासंचालक डॉ. संजय चहांदे व टीएमएमसी मुंबई, विभागाचे प्रमुख डॉ. कनक नागले उपस्थित होते. यावेळी अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस २०१४-१५च्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रसिद्ध एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सुनील आंबुलकर यांनी तर कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसीनचे तज्ज्ञ डॉ. हरीश वरभे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. वरभे म्हणाले, यावर्षी व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषत: आजार व संशोधनावर सामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येईल. ‘थायरॉईडचे वाढते आजार’, ‘लहान मुले आणि मोठ्यांमध्ये वाढती स्थुलता’, ‘ट्रान्सफ्युजन मेडिसीन’, ‘आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी’ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ‘आप की अदालत’ हा अनोखा कार्यक्रमही घेण्यात येईल. नवीन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देणे, हा मुख्य उद्देश राहणार आहे. यावेळी उपस्थितांनीही आपले विचार मांडले.पदग्रहण सोहळ्यानंतर डॉ. आंबुलकर यानी ‘आंतरग्रंथीचे आजार व उपचार पद्धती’यावर प्रकाश टाकला. डॉ. पटेकर यांनी ‘कार्डियाक अ‍ॅब्लेशन अ‍ॅण्ड बीयॉण्ड’, डॉ. चहांदे यांनी ‘हेल्थ सेक्टर अ‍ॅट क्रॉस रोड’ तर डॉ. नागले यांनी ‘मायकॉर्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन-इव्होल्युशन टू रिव्होल्युशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. राजीव मोहता व डॉ. प्राची महाजन यांनी केले. (प्रतिनिधी)