शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशात समान लोकसंख्या धोरण हवे

By admin | Updated: October 24, 2015 03:03 IST

भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे.

नागपूर : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे समस्या निर्माण होऊ नये यासाठी मतांचे राजकारण दूर सारून देशात समान लोकसंख्या धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत देशात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अनेकदा करण्यात आली आहे. येत्या काळात संघ हा मुद्दा लावून धरणार असल्याचे संकेतच सरसंघचालकांनी दिले आहेत.देशाची लोकसंख्या वाढते आहे. ५० वर्षांनंतर ही लोकसंख्या ओझे होऊ नये व मनुष्यबळाचा योग्य वापर व्हावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. समान लोकसंख्या धोरण शासन व कायद्याच्या आधारावर लागू होणार नाही, याचा स्वीकार करताना समाजाची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेदेखील ते म्हणाले. देशाची निवडणूक व्यवस्था, प्रशासन, कर व्यवस्था, उद्योग धोरण, शिक्षणप्रणाली तसेच कृषी धोरणात आमूलाग्र बदलाची गरज असल्याचेदेखील ते म्हणाले.या कार्यक्रमाला ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सारस्वत यांनी देशाच्या प्रगतीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भाष्य केले. देशाची लोकसंख्या लक्षात घेता दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता असून कृषिमालाचे योग्य ‘मार्केटिंग’देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी वेगळ््या ‘आयआयटी’ची गरज असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर तसेच दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.(प्रतिनिधी)मोदी सरकारला शाबासकीभाषणाच्या सुरुवातीलाच सरसंघचालकांनी मोदी सरकारला शाबासकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध अर्थव्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे विकसित व समर्थ भारताच्या निर्माणाचा विश्वास जनतेत उत्पन्न झाला आहे या शब्दांत सरसंघचालकांनी केंद्र शासनाचे कौतुकदेखील केले. विकास हा समन्वयातून व्हायला हवा. विविध योजन तळागाळापर्यंत पोहोचत आहेत का आढावा घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांशी संवाद साधला पाहिजे या शब्दांत मोदी सरकारला सल्लादेखील दिला.