शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दिमाखात धावली ‘कोट मोलाची कार’

By admin | Updated: August 23, 2014 03:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपूर-मौद्यात येण्यापासून तो परत दिल्लीत पोहचण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेची धाकधूक कायम होती.

नरेश डोंगरे नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपूर-मौद्यात येण्यापासून तो परत दिल्लीत पोहचण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेची धाकधूक कायम होती. दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम निर्विघ्नपणे आटोपून ते दिल्लीला गेले. त्यांच्यासोबतच त्यांची सुरक्षा वाहनारेही परतले. चर्चेत राहिली ती पंतप्रधानांची वैशिष्ट्यपूर्ण बीएमडब्ल्यू! होय, देशातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी ही ‘कोट मोलाची कार’ गुरुवारी पंतप्रधानांना घेऊन नागपुरातील रस्त्यावर दिमाखात दौडली अन् आता चर्चेचा विषय ठरली. पंतप्रधान दौऱ्याच्या बंदोबस्ताच्या दडपणातून मुक्त झालेल्या सुरक्षा अधिका-यांमध्ये या कारची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदी नागपुरातील कार्यक्रमस्थळी कशाने येतील, कोणत्या वाहनात बसतील, कोणत्या वाहनातून परत जातील, याची पूर्वतयारी सुरक्षा यंत्रणेने आधीच करून घेतली होती. पंतप्रधानांना नागपूरच्या विमानतळापासून कस्तुरचंद पार्कपर्यंत नेण्या-आणण्यासाठी दोन जॅमर आणि तीन विशेष वाहने मागवून घेण्यात आली होती. त्यात बीएमडब्ल्यू सेव्हन (७) सिरिजची ‘७६० एलआय सिक्युरिटी एडिशन’ ही अत्याधुनिक आणि अतिसुरक्षित (डीएलसीव्ही ३०००) कारही होती. खास रेल्वेने ती नागपुरात आली होती. पाच कोटी रुपये किंमत असलेल्या या कारला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी (बुलेट प्रूफ, फायर प्रूफ बनविण्यासाठी) साडेचार कोटींचा खर्च आल्याचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सांगत होते. तब्बल तीन दिवस (१९, २० आणि २१ आॅगस्ट) या कारचा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मुक्काम होता. या कारभोवती २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा होता. २० आॅगस्टच्या दुपारी या कारने रंगीत तालिम (रिहर्सल) केली आणि २१ आॅगस्टला तिने मोठ्या दिमाखात पंतप्रधान मोदी यांना विमानतळावरून केपीत आणले. तेथून विमानतळावर नेले. आपले कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री तीसुद्धा रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली.