शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा

By admin | Updated: March 4, 2017 01:49 IST

काँग्रेसच्या प्रभाग १० मधील नगरसेविका गार्गी चोपरा यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

पोस्टाने पाठविला राजीनामा : काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नागपूर : काँग्रेसच्या प्रभाग १० मधील नगरसेविका गार्गी चोपरा यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा स्पीड पोस्टने महापालिका आयुक्त, मावळते महापौर प्रवीण दटके व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना पाठविला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. चोपरा यांनी मात्र आपण व्यक्तिगत कारणाने राजीनामा देत असल्याचे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. प्रभाग १० मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकल्या होत्या. चोपडा (१०९८१ मते )यांच्यासह साक्षी राऊत (९४५६ मते), रश्मी धुर्वे (९५७७मते) व नितीश ग्वालबन्सी (९०८४ मते) विजयी झाले होते. चोपडा यांनी ४४८६ मतांनी विजय मिळविला होता तर ग्वालबन्सी हे फक्त ६८ मतांनी विजयी झाले होते. ग्वालबन्सी यांना राष्ट्रवादीकडून लढलेले रमेश घाटोळे यांचा फटका बसला होता. एकाच पॅनलमध्ये असलेल्या या दोन उमेदवारांच्या मताधिक्यातील फरक चर्चेचा विषय ठरला होता. राजीनाम्याबाबत विचारणा केली असता गार्गी चोपडा यांचे पती डॉ. प्रशांत यांनी व्यक्तिगत कारणावरून राजीनामा देत असल्याचे सांगितले. राजकारणात मन भरले आहे, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. निगम सचिव हरीश दुबे यांनीही चोपडा यांचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. पोस्टाने आलेला राजीनामा स्वीकारला जातो का, अशी विचारणा केली असता कोणत्याही माध्यमाने प्रशासनापर्यंत राजीनामा पोहचला तर त्यावर विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जाणकारांच्या मते पोस्टाने दिलेला राजीनामा तांत्रिकदृष्ट्या नगरसेवकांची पुन्हा संमती घेतल्याशिवाय मंजूर केला जात नाही. राजीनामा मिळाला नाही : मनपा प्रशासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांना विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे कोणत्याही नगरसेवकाचा राजीनामा आला नसल्याचे स्पष्ट केले. साधारणत: राजीनामा देणारी व्यक्ती स्वत: प्रशासनाकडे राजीनामा आणून देत असते, असेही त्यांनी सांगितले. नाराजी दूर करू नगरसेविका गार्गी चोपडा यांच्या राजीनाम्याची चर्चा कळताच आपण माहिती घेतली. त्यांनी महापालिका आयुक्तांकडे किंवा पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून माझ्याकडेही राजीनामा दिलेला नाही. चोपडा या चार हजाराहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांचे पती माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा हे काँग्रेसचे आधारस्तंभ आहेत. जनतेने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा अनादर होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यांची काही नाराजी असेल तर ती जाणून घेऊ. - विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस