शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अजनी वनाशी संबंधित कागदपत्रे पुरवण्याची मनपाची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

नागपूर : संत्रा नगरीतील घनदाट अजनी वन वाचण्यासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी ...

नागपूर : संत्रा नगरीतील घनदाट अजनी वन वाचण्यासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी यांना येत्या ५ जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रे पुरवण्याची ग्वाही महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने अजनी वनाशी संबंधित पुरेशी माहिती रेकॉर्डवर उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. एम. अनिलकुमार यांनी महानगरपालिकेला वृक्ष समितीचा अहवाल, वृक्ष गणनेची माहिती व वृक्ष कापण्यासाठी सादर अर्जाची प्रत मागितली असल्याचे सांगितले, तसेच ही माहिती अद्याप मिळाली नाही, याकडे लक्ष वेधले. त्याच्या उत्तरात महानगरपालिकेने सदर ग्वाही दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुढील तारखेपर्यंत याचिकेत आवश्यक दुरुस्ती करण्याची सूचना केली.

इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता अजनी वनातील ४९३० झाडे कापण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने २९ मे रोजी नोटीस जारी करून आक्षेप मागवले आहेत. ही नोटीस अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे सरकारी जबाबदारी आहे. विविध पर्यावरण संस्थांच्या अहवालानुसार नागपूरचे तापमान व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत अजनीतील घनदाट वनसंपदा नष्ट केल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.