शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 20:19 IST

दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीतील इमाम कारी खालीक यांच्याशी फोनवर संवाद  साधला.

ठळक मुद्देनागपूरच्या जामा मशिदीतील इमामांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद कोरोनाबाबत शंका असलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीतील इमाम कारी खालीक यांच्याशी फोनवर संवाद  साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इमामांना कोरोनाच्या या लढाईत मदतीचे आवाहन केले. तसेच त्यांना समजावले की, तपासणी न केल्यास काय धोका होऊ शकतो. जे लोक पॉझिटिव्ह आढळून येतील, त्यांच्यावर उपचार शक्य आहे. उपचार झाला नाही तर त्यांच्या स्वत:सह इतरांनाही संसर्गाचा धोका आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी इमामांनी समाजातील लोकांशी चर्चा करावी आणि त्यांना तपासणी करून घेण्यास पुढे यावे, अशी विनंतीही केली.विशेष म्हणजे दिल्ली निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ७ लोक नागपूरला परतले आहेत. एका संशयित रुग्णास मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला आहे. यादरम्यान नागपूर मरकजच्या ५४ लोकांना स्थानिक प्रशासनाने आमदार निवासातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे.समाजाशी करणार चर्चालोकमतशी चर्चा करताना इमाम साहेब यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेवर निश्चितच अंमल करतील. समाजातील लोकांशी ते चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या कामासाठी मदत मागितली आहे. तेव्हा आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू.