शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात अमरावतीने नागपूरला पुन्हा टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:12 IST

नागपूर : विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा ११ महिन्यांच्या काळात दुसऱ्यांदा दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येने अमरावतीने ...

नागपूर : विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा ११ महिन्यांच्या काळात दुसऱ्यांदा दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येने अमरावतीने नागपूरला मागे टाकले. शनिवारी अमरावती जिह्यात ७२७, तर नागपूर जिल्ह्यात ७२५ रुग्णांची नोंद झाली. विदर्भात २,१८४ नव्या रुग्णांची भर पडली, तर २२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या २,९६,०९५, तर मृत्यूची संख्या ७२०३ झाली.

विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ व अकोल्यात रुग्णांची संख्या थोड्या अधिक फरकाने पुन्हा वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्याने आज रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. ७२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २८,८१५, तर मृतांची संख्या ४६० झाली. सध्या ३,६१६ रुग्ण उपचाराखाली आहेत. नागपूर जिल्ह्यात ७२५ रुग्णांची नोंद व सहा रुग्णांचे मृत्यू झाले. बाधितांची एकूण संख्या १,४२,५०७, तर बळींची संख्या ४,२६७वर पोहोचली. ५,८३४ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. शुक्रवारच्या तुलनेत रुग्ण व मृत्यूच्या संख्येत किंचित घट आली. भंडारा जिल्ह्यात आज २० रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ५६ रुग्ण व २ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात पाच रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात तीन, चंद्रपूर जिल्ह्यात २२, अकोला जिल्ह्यात १७३ रुग्ण व २ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात १४५ रुग्ण व २ मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यात २१५ रुग्ण व ३ मृत्यू, तर वाशिम जिल्ह्यात ९३ नव्या रुग्णांची भर पडली.