शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची ही दुसरी लाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता १५ ते २१ मार्च दरम्यान नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता १५ ते २१ मार्च दरम्यान नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु शहरातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्यानुसार ही दुसरी लाट असावी. यामुळे पहिल्यापेक्षा ती मोठी असणार, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

- पहिलीच्या तुलनेत आता धोका जास्त - डॉ. जय देशमुख

वरिष्ठ फिजीशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोनाची ही दुसरी लाट असावी आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत ही जास्त धोकादायक ठरू शकेल. मागील वर्षीच्या तुलनेत आता कोरोना वेगाने पसरताना दिसून येत आहे. एकाच घरात दोनपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. लसीकरणाची संख्या वाढल्याने काहीशी बेफिकिरी आली आहे. यामुळे काही लक्षणे दिसूनही किंवा बाधितांच्या संपर्कात येऊनही संशयित रुग्ण वेळीच तपासणी करीत नाहीत. आजार वाढल्यावरच डॉक्टरांकडे जात आहेत. अशा रुग्णांकडून ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. आजाराची गुंतागुंत वाढली आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन झाले का, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

- पुढील काही दिवस धोक्याचे - डॉ. अशोक अरबट

श्वसनरोग विकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहता पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. यामुळे कोरोनाचे प्रतिबंधक नियम अधिक काटेकोरपणे पाळणे, विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एकाच घरात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. यामुळे लक्षणे आढळताच निदान करणे, पॉझिटिव्ह आल्यास स्वत:ला क्वारंटाइन करणे व उपचार घेणे आवश्यक आहे. कोरोना वाढण्यामागे प्रशासनाची चूक नाही तर ही चूक आपली आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने, कोरोनाचे प्रतिबंधक नियम न पाळल्याने कोरोना वाढताना दिसून येत आहे. यामुळे आता तरी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे.

-६० वर्षांवरील रुग्णांमध्ये धोका वाढला - डॉ. अश्विनी तायडे

संसर्गजन्य आजार रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा कमी झाला होता तेव्हा आपण हवी ती काळजी घेतली नाही. यामुळे आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येतील. सध्याच्या स्थितीत कोरोनाचे ६० वर्षांवरील अधिक रुग्ण दिसून येत आहेत. त्यांना इतरही आजार असल्याने कमी दिवसांत त्यांच्यात आजाराची गुंतागुंत वाढत आहे. यामुळे अधिक काळजी घेणे, स्वत:ला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.