शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लोक झालेत शाकाहारी : नागपुरात डाळींची विक्री ३० टक्के वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:30 IST

कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे.

ठळक मुद्देदेशात डाळींचा मुबलक साठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, सध्या तूर डाळीसह अन्य डाळीची जास्त प्रमाणात विक्री होत आहे. ग्राहकांकडून दररोज मागणी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात डाळींचे उत्पादन २४० ते २५० लाख टन होते. त्यातुलनेत विक्रीही अंदाजे २५० लाख टन आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने अनेक डाळी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात विकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले होते. विदेशातून चणा, तूर, मूग, उडद, वाटाणा, मसूर, काबुली चणा, हिरवा वाटाणा आयात होते. आता मात्रात्मक आयातीचे निर्बंध हटविले आहेत. याशिवाय बंद असलेली निर्यात सुरू झाली आहे. पण सरकारने अनेक डाळींवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. तसेच सरकारनेही मोठ्या प्रमाणात सरकारी एजन्सीच्या माध्यमातून देश-विदेशातून डाळींची खरेदी सुरू केली आहे. त्यानंतरही देशात डाळींचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी राहिले.मोटवानी म्हणाले, मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात सुरक्षेच्या दृष्टीने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकांना बचावासाठी जागरूकता अभियान सुरू केले. लोकांनी मांसाहार त्यागून शाकाहाराचा अवलंब सुरू केला. त्यामुळेच सर्व प्रकारच्या डाळींच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली. लॉकडाऊननंतर देशात गतवर्षीच्या याच काळात २१ लाख टनाच्या तुलनेत २६ लाख टन डाळींची विक्री झाली. देशात डाळींची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त डाळींची खरेदी करू नये. सरकारकडे ४३५ लाख टन खाद्यान्नांचा साठा आहे. त्यामध्ये २७२.१९ लाख टन तांदूळ, १६२.७९ लाख टन गहू आणि ३७ लाख टन डाळींचा साठा आहे. या साठ्यातून सरकार १ एप्रिलपासून ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू आणि एक किलो तूर डाळ रेशन दुकानातून दरमहा देत आहे. त्यामुळे गरिबांची गरज पूर्ण होणार आहे.सध्या देशात डाळींचा पुरेशा साठा आहे. पण वाहतूक व्यवस्था बंद असल्याने माल होलसेलमधून किरकोळमध्ये मिळत नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. सध्या कच्चा माल नसल्याने फिनिश मालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर भाव पुन्हा कमी होणार आहे. मोटवानी म्हणाले, मांसाहाराच्या तुलनेत एक कुटुंब एक किलो डाळीचा उपयोग अनेक दिवस करू शकतो. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. देशात डाळींची विक्री वाढण्याचे संकेत चांगले आहेत. त्यामुळे पिकाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. देशात डाळीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न