शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय हवा

By admin | Updated: February 26, 2016 03:06 IST

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात

विशेषाधिकार समितीची अनौपचारिक चर्चा : समिती प्रमुख नीलम गोऱ्हे यांचे मतनागपूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात तेव्हा ते समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कालबद्धता पाळल्यास विशेषाधिकार भंगाचे प्रकार टाळता येणे शक्य आहे. असे मत विधान परिषद विशेषाधिकार समिती प्रमुख तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.रविभवन येथील सभागृहात शासकीय विभाग प्रमुखांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेच्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे या बोलत होत्या. यावेळी विशेषाधिकार समितीचे सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर, शरद रणपिसे, श्रीकांत देशपांडे तसेच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, नागो गाणार, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदी उपस्थित होते.डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, शिक्षण विभागाविषयी ज्या अनेक तक्रारी आहेत त्यासाठी विशेषाधिकार समितीची वेगळी बैठक घेण्यात येईल. यासोबतच पोलीस विभाग राबवित असलेल्या गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क व प्रणाली (सीसीटीएनएस) या पद्धतीविषयी त्या-त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी सूचना उपस्थित पोलीस अधीक्षकांना यावेळी केली.अधिकाऱ्यांनी कायद्याच्या तरतुदीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सार्वजनिक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींसोबत सौजन्यपूर्वक वागणूक तसेच त्यांनी दिलेल्या पत्राची तातडीने दखल घेऊन पोच देण्याच्या कामी सुद्धा तत्परता दाखवावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास यांनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. बैठकीत जिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. दीपक म्हैसेकर(चंद्रपूर), आशुतोष सलील(वर्धा), डॉ. विजय सूर्यवंशी(गोंदिया), पोलीस अधीक्षक अनंत रोकडे(नागपूर), अंकित गोयल(वर्धा), शशिकुमार मीना(गोंदिया), चंद्रपूर मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, डॉ. महेंद्र कल्याणकर, राजेंद्र निंबाळकर, दिलीप गावडे तसेच सुनील पडोळे, जी. एम.तळपाडे, अपर आयुक्त हेमंत पवार आणि विधान मंडळाचे विधी उपसचिव नंदलाल काळे, अवर सचिव उमेश शिंदे आदी उपस्थित होते.