शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच ...

चंद्रशेखर बावनकुळे : आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठकनागपूर : स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच व्हेंटिलेटर व आयसीयु असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ रुग्ण दगावले आहे. या आजारावर तात्काळ नियंत्रण तसेच आवश्यक औषधोपचार या संदर्भात आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र्र सवई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रामनाथ सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे, डॉ. प्रफुल्ल पांडे, डॉ. पोद्दार, डॉ. गिल्लुरकर आदी तज्ज्ञ उपस्थित होते. (प्रतिनिधी) आजाराबाबत जागृती मोहीम राबविणारस्वाईन फ्लू आजारासंदर्भात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती असावी या दृष्टीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू या आजाराबद्दल तसेच घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेनेही पॅनिक होऊ नये, असे आवाहन केले. घाबरू नका खबरदारी घ्यास्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य असून नागरिकांनी या आजाराबाबत न घाबरता हा आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार विनाविलंब सुरू करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये व फ्लूची लक्षणे असतील तर हस्तांदोलन न करण्याची काळजी घ्यावी असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.नागपुरात २२ रुग्णांमध्ये लक्षणे जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नवाडे यांनी माहिती देताना सांगितले की, नागपूर शहर व ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २२ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. तर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे यांनी महानगरपालिकेतर्फे ३४ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.