कूलर मार्केट ‘फुल्ल’ : मार्च संपायला आला की नागपूरकरांना वेध लागतात कूलर बसविण्याचे. त्यासाठी फेब्रुवारीपासूनच कॉटन मार्केटमधील कूलरचा बाजार सज्ज आहे. डेझर्टपासून ते इतर विविध प्रकारातील व विविध आकारातील कूलर या ठिकाणी असून, ग्राहकांची खरेदीसाठी दिवसभर गर्दी दिसून येत आहे. सोबतीला जुन्या कूलरच्या दुरुस्तीचे साहित्यही या बाजारात उपलब्ध आहे. मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही कूलरचे भाव आहेत. काही प्रमाणातच यात वाढ झालेली दिसून येत आहे.
कूलर मार्केट ‘फुल्ल’ :
By admin | Updated: March 18, 2016 03:15 IST