शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’ची प्रवेशप्रक्रिया सुरू

By admin | Updated: June 26, 2015 02:44 IST

वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कामगारांशी संबंधित मुद्यांवर अभ्यासदेखील वाढीस लागला आहे.

नागपूर : वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कामगारांशी संबंधित मुद्यांवर अभ्यासदेखील वाढीस लागला आहे. कामगारांशी संबंधित मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, कामगार कल्याण हे विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेद्वारा संचालित प्रादेशिक कामगार संस्थेतर्फे हा अभ्यासक्रम घेण्यात येतो.या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरिता १९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात एकूण ४० जागा असून, मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ५० टक्के जागा राखीव आहेत. या अभ्यासक्रमात मनुष्यबळ व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कामगार कल्याण, कामगार कायदे या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. अभ्यासक्रमात ५० टक्के ‘फिल्ड वर्क’ आहे. या अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेण्यात येणार आहे. यात लेखी परीक्षा, गटचर्चा, मुलाखत हे टप्पे आहेत. आयटी पार्कजवळील प्रादेशिक कामगार संस्था, गायत्रीनगर येथे प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १९ जुलै आहे.(प्रतिनिधी)