शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:12 IST

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले.

ठळक मुद्देमुंबईत मुसळधार पाऊस : सकाळच्या विमानाचे सायंकाळी उड्डाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले. याशिवाय मंगळवारी इंडिगोचे कोलकाता-मुंबई, आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँकॉक-मुंबई आणि बुधवारी चंदीगड-मुंबई अशा एकूण पाच विमानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लँडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि शेकडो प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले. याशिवाय बुधवारी सकाळी ८ वाजता मुंबईकडे उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान सायंकाळी ६ वाजता मुंबईकडे रवाना झाले. याशिवाय बुधवारी जेट एअरवेज, इंडिगो, एअर इंडिया व गो-एअर ही चार कंपन्यांची नागपुरातून मुंबईकडे जाणारी विमाने रद्द करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी नागपूरहून रात्री ९ वाजून २० मिनिटांनी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला मुंबईच्या विमानतळावर उतरण्यास मनाई करण्यात आल्याने ते ११ वाजून २० मिनिटांनी नागपूर विमानतळावर माघारी आले. चंदीगड-मुंबईचे विमान बुधवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले आणि दुपारी ४ वाजता मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.एअर इंडिया कंपनीने विमानातील प्रवाशांची कुठलीही सोय केली नाही, असे सूत्रांनी सांगितले. नागपूरचे प्रवासी घरी गेले, पण मुंबई येथील प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले. यातच या विमानात झिम्बाब्वेचे १९ वर्षांखालील टीमचे २२ सदस्यही विमानतळावर अडकले होते रात्री येणाºया दोन आंतरराष्ट्रीय विमानांचे कारण देत नागपूरच्या विमानतळावरील प्रसाधनगृहेही विमानतळ प्रशासनाने बंद केली. या संपूर्ण प्रकारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक प्रवासी, महिला आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागला.