शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

घराचे बांधकाम महागले

By admin | Updated: April 8, 2015 02:34 IST

सर्वसमान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. परंतु आता ही बाब त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. शहरातील बांधकामावर ३५ ते ५८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

नागपूर : सर्वसमान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. परंतु आता ही बाब त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. शहरातील बांधकामावर ३५ ते ५८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. बांधकामातील मोठी रक्कम महापालिकेला विकास शुल्क म्हणून द्यावी लागणार आहे. त्यामुळे सीताबर्डी, सिव्हिललाईन, महाल यासारख्या वर्दळीच्या भागात घर उभारण्याचे मध्यमवर्गींयांचे स्वप्न भंगणार आहे. फेब्रुवारी व मार्च महन्यात बांकामासाठी मनपाची अनुमती घेणाऱ्यांची संख्या कमी असते. परंतु मार्च महिना संपताच यासाठी लोकांची गर्दी होते. यासाठी मनपाच्या नगररचना विभागात आल्यानंतर मात्र दरवाढ बघून अनेकांना धक्काच बसला. हजारातील विकास शुल्क लाखावर गेल्याचे निदर्शनास आले. त्यातच नासुप्रनेही नवीन नियमाचा आधार घेत विकास शुल्क वसुलीला सुरुवात केली आहे. या विरोधात विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनने आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव डॉ. नितीन करीर व महापौर प्रवीण दटके यांना पत्र दिले आहे. या संदर्भात मंगळवारी व्हीटीएच्या शिष्टमंडळाने दटके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात अध्यक्ष जे.पी.शर्मा, सचिव तेजिंदरसिग रेणू, विविध स्तरावर करण्यात आलेली करवृद्धी निदर्शनास आणली. (प्रतिनिधी)सभागृहात प्रस्ताव आणणारकरण्यात आलेली दरवाढ अन्यायकारक आहे. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात आणून शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रवीण दटके यांनी दिले.स्वप्न भंगणारनवीन शुल्काची आकारणी प्रति चौरस फुटावर केली जाते. यावर २०० ते ३०० प्रति चौरस फूट रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणे कठीण झाल्याची माहिती रेणू यांनी दिली. शर्मा यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. शिषटमंडळात हेमंत त्रिवेदी, अमरजितसिंग चावला, राजेश कानुगो आदींचा समावेश होता.असे वाढले दरमागील सरकारने महाराष्ट्र अधिनियम २०१० पारित करून मनपा, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्रातील लेआऊ ट व इमारत बांधकाम अनुमती देताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम १०६६ च्या कलम १२४ बी अंतर्गत ही जाचक दरवाढ करण्यात आली आहे. मनपाच्या परिपत्रकानुसार नवीन दर २३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. त्यानुसार निवासी बांधकामासाठी रेडिरेकनरच्या २ टक्के तर व्यापारी कारणासाठी ४ टक्के विकास शुल्क द्यावा लागणार आहे. आता लाखात शुल्कमालमत्ताधारकांना आजवर हजारात विकास शुल्क भरावे लागत होते. आता हा आकडा लाखात गेला आहे. धरमपेठ भागात यापूर्वी १ हजार चौ. फूट जागेसाठी हजारात खर्च होता, आता ता लाखात गेला आहे. महाल, मानेवाडा, सीताबर्डी, धरमपेठ आदी भागात १ हजार चौ. फूट बांधकामासाठी ५५७४ रुपये शुल्क भरावे लागत होते. आता अनुक्र मे १०७५७८, १००३३२, १९००७३, १३९३५० शुल्क द्यावे लागणार आहे. अशीच शुल्कवाढ व्यापारी बांधकामावर आकारले जाणार आहे.