शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयाची इमारत साकारणार

By admin | Updated: March 20, 2016 03:12 IST

जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित ‘एल’ आकाराच्या इमारतीसाठी राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात ९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

९१ कोटी मंजूर : मुख्यमंत्र्यांनी पाळला शब्दनागपूर : जिल्हा न्यायालयाच्या प्रस्तावित ‘एल’ आकाराच्या इमारतीसाठी राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात ९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी दिलेला शब्द पाळल्याने त्यांचे जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने आभार मानण्यात आले आहे. लोकमतने या विषयावर विशेष वृत्त प्रकाशित करीत सरकारचे लक्ष वेधले होते. अर्थसंकल्पात राज्यातील न्यायालयीन अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि न्यायालयीन इमारतीसाठी ४९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ९१ कोटी रुपये नागपूर जिल्हा न्यायालयाची एल आकाराची इमारत साकारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. गत वेळी २२ मार्च २०१५ रोजी जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाची इमारत मंजूर करून देतो, त्यासाठी जे काही बजेट आहे, त्यात वाढ करून देतो, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळून न्यायालय इमारतीचा प्रश्न सोडवल्याने जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत भांडेकर, अ‍ॅड. उदय डबले आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तेलगोटे यांनी शासनाकडे धूळ खात पडून असलेल्या या इमारतीच्या प्रस्तावाबाबतच्या फाईल्सचा सतत पाठपुरावा केला होता. ‘एल’ आकाराची ही इमारत न्यायालयाच्या दगडी इमारतीसमोरील सायकल स्टॅण्डच्या मोकळ्या जागेपासून ट्रेझरी बारपर्यंत बांधण्यात येणार आहे. यासाठी सध्याचे कुटुंब न्यायालय आणि ट्रेझरी बारही तोडले जाणार आहेत. एकूण १९ हजार ६१५ चौरस मीटर जागेत ही इमारत बांधली जाणार आहे. ती न्यायमंदिराच्या मूळ आठ मजली इमारतीला जोडली जाणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यात आणि पहिल्या मजल्यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची पार्किंग राहणार आहे.(प्रतिनिधी)