शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणेही बलात्कारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST

नागपूर : चांगल्यावाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून वासनेची शिकार करणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय ...

नागपूर : चांगल्यावाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून वासनेची शिकार करणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणेही बलात्कारच होतो, असे न्यायालयाने या निर्णयामध्ये स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.

न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला आहे. आरोपीने स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीच्या सहमतीचा मुद्दा मांडला होता. मुलीची शरीरसंबंध ठेवण्यासाठी सहमती होती. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला होता. न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला. अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच महत्त्व नाही, असे निर्णयात नमूद करण्यात आले.

गजानन देवराव राठोड असे प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी आहे. १८ जून २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने राठोडला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व एकूण ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध राठोडने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

----------------

प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

घटनेच्या वेळी पीडित मुलगी केवळ १४ वर्षे वयाची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. दरम्यान, आरोपीने २७ जून २०१६ रोजी मुलीला पळवून आत्याच्या घरी नेले, तसेच मुलीसोबत लग्न केल्याचे सांगून दोन दिवस राहू देण्याची विनंती केली. आत्याने त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र खोली दिली. त्यामुळे आरोपीने दोन दिवस मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. तिसऱ्या दिवशी नातेवाइकांनी दोघांनाही नेरमध्ये परत आणले. तत्पूर्वी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीसोबत शरीरसंबंध ठेवण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी, आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.