शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोन अंध ग्राहकांना २४ तासात वीजजोडणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कार्यालयात वारंवार चकरा मारूनही वीजजोडणी मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु स्वत: पुढाकार घेऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कार्यालयात वारंवार चकरा मारूनही वीजजोडणी मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु स्वत: पुढाकार घेऊन दोन अंध ग्राहकांना अवघ्या २४ तासात वीजजोडणी देऊन महावितरणने एक नवीन आदर्श घालून दिला. संवेदनशील कर्मचाऱ्याच्या कार्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहेत.

खापरखेडा उपविभाग अंतर्गत दहेगाव रंगारी येथील दिनेश मथुरे व शारदा मथुरे हे अंध दाम्पत्य वाॅर्ड नं. ३ येथे वास्तव्यास आहे. तसेच सूरज शंकर रंधाई हे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले गृहस्थ आपल्या आईसोबत इटणगोटी येथे राहतात. या दोन्ही अंध नागरिकांना विद्युत पुरवठ्याची आवश्यकता होती. परंतु त्यासाठी कार्यालयात जाऊन अथवा ऑनलाइन अर्ज करणे त्यांना अडचणीचे ठरत होते.

दहेगाव रंगारी येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये अंध ग्राहकाची समस्या खापरखेडा उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मंगेश काहाळे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांच्या निर्देशानुसार पाटणसावंगी ग्रामीण वितरण केंद्रातर्फे शारदा मथुरे यांना २४ तासाच्या आत वीजजोडणी देण्यात आली. दुसरे अंध ग्राहक सूरज रंधाई यांना वीजजोडणी मिळावी यासाठी पाटणसावंगी शहर वितरण केंद्रात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता आशिष चेटुले व विद्युत सहायक रितेश ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक तातडीने कार्यवाही केली. त्यांनी रंधाई यांचा अर्ज मिळताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत २४ तासांच्या आत वीजपुरवठा करून उपलब्ध दिला.