शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये सेना वाढविणार काँग्रेसची डोकेदुखी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

नागपूर : काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत १६ ...

नागपूर : काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत १६ ही जागेवर उमेदवारी देण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेनेच्या मतांची टक्केवारी लक्षात घेता करंभाड व बोथिया पालोरा या दोन जागेवर दावा केला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस जिंकली असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढली तर काँग्रेसला फटका बसू शकतो.

२००७, २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने ७ ते ८ सदस्य निवडून आणित सत्तेत वाटा मिळविला होता. शिवसेना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले वर्चस्व जिल्ह्यात कायम ठेवत होती; पण २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पडली. शिवसेनेचा एकच सदस्य निवडून आला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काही ठिकाणी आघाडी करून लढली होती; पण शिवसेना स्वबळावर लढली. काही जागेवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.

राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर जिल्हा परिषदेतही असाच प्रयोग झाला; पण सत्तेत सेनेच्या सदस्याला कुठलेही महत्त्व दिले गेले नाही. तसे तर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या वाट्यालाही फारसं लागू दिले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादी भूमिका सत्तेशी सकारात्मक दिसली नाही.

११ पैकी ७ जागांवर सेना लढली होती

- सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७, राष्ट्रवादीचे ४, भाजपाचे ४ व शेकापचा १ सदस्य आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रद्द झालेल्या ७ पैकी ५ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. तर राष्ट्रवादीच्या ४ पैकी २ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. शिवसेनेच्या मतांचीही टक्केवारी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे स्वबळाच्या नारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.

- शिवसैनिक झाले अ‍ॅक्टीव्ह

२०१९ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शिवसेनेला मोठा फटका बसला. जिल्ह्यात शिवसेना संपली अशीच अवस्था झाली होती; पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची कमान सांभाळल्यानंतर शिवसैनिक अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. जिल्ह्याचे स्थानिक नेते आशिष जैस्वाल पुन्हा सेनेत परतले आहेत. शिवसेनेने जिल्ह्यात नवीन रचनाही केली आहे. जिल्हा परिषदेत नामुष्की टाळण्यासाठी किमान २ जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना महाविकास आघाडीत असली तरी काहीच स्थान नाही. त्यामुळे सेनेला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी आहे.