शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय काँग्रेसी अणेंसोबत

By admin | Updated: March 23, 2016 02:52 IST

विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय

नागपूर : विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच खलबते सुरू झाली आहेत. विधिमंडळात श्रीहरी अणे यांच्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला होता. परंतु विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांनी मात्र अ‍ॅड.अणे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यामुळे एकाच मुद्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन भूमिका निर्माण झाल्या आहेत.वेगळ््या विदर्भाचे काँग्रेसने समर्थन केले नव्हते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा तापला होता. अ‍ॅड.अणे यांनी अगोदर स्वतंत्र विदर्भ व आता वेगळ््या मराठवाड्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने विधिमंडळात जोरदार निषेध केला. काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी तर पार मुंडके तोडण्याची भाषा केली.एकीकडे राज्यात काँग्रेसकडून अणे यांचा विरोध होत असताना विदर्भातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मात्र ‘अणे’ राग आवळला आहे. अणे यांनी राजीनामा दिला असला तरी सर्व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी असल्याचे वक्तव्य नेत्यांकडून देण्यात आले आहे. इतकेच काय पण विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यासंदर्भात काँग्रेसच्या माजी शासनकर्त्यांवर टीकादेखील करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांनीदेखील गोपनीयतेच्या अटीवर अ‍ॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी जाहीरपणे अ‍ॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. वेगळ््या राज्याची मागणी करण्याचे अणे यांना स्वातंत्र्य आहे. अणे यांची एकट्याची ही लढाई नसून विदर्भ, मराठवाड्याची आहे. गेल्या सहा दशकात राज्यकर्त्यांनी विदर्भाला कधी झुकते माप दिले नाही व मराठवाड्याचीदेखील दखल घेतली नाही. विदर्भ विकासासाठी केलेल्या नागपूर करारातील एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. विदर्भवादी त्यांच्या पाठीशी असून त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्यांना भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी सणसणीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीदेखील विदर्भाच्या मुद्यावर अ‍ॅड.अणे यांचे समर्थन केले आहे. श्रीहरी अणे हे अगोदरपासूनच विदर्भवादी आहेत. जर विदर्भाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आक्षेप घेत राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला असेल तर ते योग्य नाही, असे मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अणे यांनी विदर्भाबाबत दिलेल्या वक्तव्याचा माणिकरावांनीच विधानपरिषदेत निषेध केला होता.(प्रतिनिधी)अणे यांच्यावर अन्याय केलाश्रीहरी अणे यांनी नेहमीच विदर्भाची भूमिका मांडली आहे. विदर्भातील जनतेचीही हीच भावना आहे. भाजपने विदर्भातील जनतेला धोका दिला आहे. शिवसेनेच्या दबावात भाजपने अणे यांच्यावर महाधिवक्ते पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला. हा निर्णय दुर्दैवी असून अणे यांच्यावर अन्याय करणार आहे. - सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री