शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पंजावरच लढणार

By admin | Updated: November 6, 2016 02:13 IST

विदर्भ काँग्रेस निर्माण होईल, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी केलेले नाही.

विजय वडेट्टीवार : शिस्त न पाळल्यास कारवाईनागपूर : विदर्भ काँग्रेस निर्माण होईल, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी केलेले नाही. महापालिका निवडणूक पक्षाच्या ‘पंजा’ चिन्हावरच लढली जाणार आहे. कार्यकारिणी संदर्भात काही नाराजी असेल, काही नावे सुटली असतील तर ती समाविष्ट करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिले होते. असे असतानाही कुणी पक्षशिस्तीचा भंग करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले नागपूरचे पालक व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.महापालिकेत गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता शहरातील नागरिकांनी अनुभवली आहे. या काळात शहराचा किती विकास झाला, याची सर्वांनाच जाणीव आहे. नागरिकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. ज्या प्रभागात उमेदवारीत स्पर्धा नाही, अशा प्रभागातील उमेदवारांची नावे लकरच निश्चित केली जातील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडून विदर्भ काँग्रेस स्वतंत्र लढणार, निवडणुकीत पंजा गोठविण्यात येणार अशा चर्चा पसरविल्या जात आहेत. काँग्रेसच्या कोणत्याही जबाबदार नेत्याने अशा आशयाचे वक्तव्य केलेले नाही वा प्रसिद्धीसाठी लेखी दिलेले नाही. काँग्रेस निवडणूक पंजावरच लढणार आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात महापालिकेतील भाजपने जनतेची लूट केली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता येऊ नये म्हणून फूट पडल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. कोणत्याही नेत्याने पक्ष कमकुवत करणाऱ्या बातम्या पसरविताना आपल्या नावानिशी देण्याची हिंमत दाखवावी, असेही ते म्हणाले. शहर कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी नेत्यांनी सुचविलेल्या नावांची यादी प्रदेश समितीकडे पाठविली होती. पक्षाच्या बैठका झाल्या. मात्र, पद मिळूनही पक्षाच्या कामात स्वारस्य नसेल तर त्यांच्याजागी दुसऱ्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार संधी दिली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन सुरू आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे आयोजित केले जाणार आहेत. १९ नोव्हेंबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, देवा उसरे, संजय सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)