शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

महागाईविरोधात काँग्रेसचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:25 IST

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. सोबतच महागाई प्रचंड वाढली आहे. अव्वाच्यासव्वा कर वसूल करून केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे.

ठळक मुद्देविधानसभानिहाय ब्लॉक स्तरावर निदर्शने : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. सोबतच महागाई प्रचंड वाढली आहे. अव्वाच्यासव्वा कर वसूल करून केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. केद्र सरकारच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराच्या सर्व विधानसभा क्षेत्रातील ब्लॉक स्तरावर पेट्रोल पंपापुढे एकाचवेळी निदर्शने करण्यात आली. यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील माटे चौकातील पेट्रोल पंपापुढे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात व ब्लॉक अध्यक्ष पंकज निघोट यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सोबतच महागाईविरोधात जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पत्रके वाटली.दक्षिण नागपुरातील दत्तात्रयनगर येथील महाकाळकर सभागृहासमोरील पेट्रोल पंपावर शहर काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, जयंत लुटे, नगरसेवक संजय महाकाळकर, ब्लॉक अध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर आदींच्या नेतृत्वात सकाळी १० च्या सुमारास पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानतंर ब्लॉक क्रमांक ६ काँग्रेस कमिटीतर्फे मानेवाडा चौक येथील पेट्रोलपंपापुढे निदर्शने करण्यात आली. ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, गजराज हटेवार , अ‍ॅड. अशोक यावले, यांच्यासह पदाधिकाºयांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.ब्लॉक क्र. १ च्या अध्यक्ष निर्मला बोरकर यांच्या नेतृत्वात शांतिनगर येथील पारडी चौकातील पेट्रोलपंपापुढे निदर्शने करण्यात आली. ब्लॉक क्रमांक ३ च्या वतीने हसनबाग भागातील जट्टेवार मंगलकार्यालयाच्या बाजूच्या पेट्रोलपंपापुढे ब्लॉक अध्यक्ष राजेश पौनिकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.ब्लॉक क्र. ८ तर्फे रहाटे कॉलनी चौक साईबाबा मंगल कार्यालयासमोरील पेट्रोल पंपावर ब्लॉक अध्यक्ष रव्ी खडसे, ब्लॉक ९ चे पंकज निघोट यांच्या नेतृत्वात माटे चौकातील पेट्रोलपंपापुढे निदर्शने करण्यात आली. ब्लॉक १० च्या वतीने राजकुमार कमनानी यांच्या नेतृत्वात शंकरनगर चौकात ब्लॉक १२ तर्फे प्रमोदसिंग ठाकू र यांच्या नेतृत्वात , अ‍ॅड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्वात ब्लॉक क्रमांक १३ मध्ये सूरज आवळे,यांच्या नेतृत्वात १० नंबर पूल येथील पेट्रोल पंपापुढे, ब्लॉक क्रमांक १४ मध्ये इश्शाद मलीक यांच्या नेतृत्वात कडबी चौकात, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. ब्लॉक क्रंमांक १५ मध्ये शंकर देवगडे यांच्या नेतृत्वात आॅटोमोटीव्ह चौक, ब्लॉक १६ येथे महेश श्रीवास यांच्या नेतृत्वात तसेच दोसर भवन चौक पेट्रोलपंपापुढे आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष हाजी शेख हुसैन, रमण पैगवार यांच्या नेतृत्वात निदर्शने व जोरदार नारेबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून तीव्र निदर्शने करण्यात आली. मोदी सरकार हाय, हाय, अच्छे दिन कहा गये, मोदी सरकार धोकेबाज अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान शहराच्या विविध भागातील पेट्रोलपंपापुढे निदर्शने करण्यात आली.पूर्व नागपुरात वंजारी यांच्या नेतृत्वात आंदोलनपूर्व नागपूर विधानसभा शांतिनगर, हसनबाग, वर्धमाननगर चौक अशा विविध ठिकाणी पेट्रोलपंपापुढे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जागतिक पातळीवर पेट्रोलच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असताना भारतात मात्र पेट्रोलच्या दरात सतत दरवाढ केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याने सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.दोसरभवन चौकात निदर्शनेमध्य नागपूर ब्लॉक काँग्रेस १८ तर्फे पेट्रोल दरवाढ तसेच महागाईविरोधात दोसर भवन चौक येथे केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महेश श्रीवास यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी सरचिटणीस हाजी शेख हुसन, रमण पैगवार, रमेश पुणेकर, तौसीफ अहमद, हाजी समीर, अब्दुल नियाज, अनिल शर्मा, अशोक निखाडे, सुनील दहीकर, मोतीराम मोहाडीकर, रमण ठवकर, दिलीप गांधी, रमेश नंदनवार, बंसीलाल गौर, साबीर खान, मधुसूदन श्रीवास, अतिक कुरैशी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.