शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने लुटले, मोदींनी निराश केले

By admin | Updated: January 22, 2017 02:13 IST

देशातील काळा पैसा असलेल्या व्यक्तींची ‘पोलखोल’ करण्याची संधी संपुआ सरकारकडे होती.

राम जेठमलानी : सगळ्यांची संमती असेल तरच आरक्षण हटवावे नागपूर : देशातील काळा पैसा असलेल्या व्यक्तींची ‘पोलखोल’ करण्याची संधी संपुआ सरकारकडे होती. मात्र त्यांच्याच नेत्यांनी देशाला लुटले असल्यामुळे त्यांनी त्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी ठोस पावले उचलतील अशी आशा होती. मात्र त्यांनीदेखील निराशच केले आहे, या शब्दांत ज्येष्ठ वकील व खा.राम जेठमलानी यांनी आजी-माजी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. रायसोनी समूहातर्फे जी.एच.रायसोनी महाविद्यालयात आयोजित चौथ्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) विजय डागा व रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी यावेळी उपस्थित होते. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्यावर यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. २००८ साली स्विस बँकांमध्ये काळा पैसा असणाऱ्या जगातील १४०० लोकांची यादी जर्मनीला मिळाली होती व यात सर्वात जास्त नावे भारतीयांची होती. जर्मनीने संबंधित माहिती भारताला देण्याची तयारी दाखविली होती. मात्र तत्कालीन संपुआ सरकारने त्यात पुढाकार घेतला नाही. विरोधकांनीदेखील यासंदर्भात मौन राखले होते. जेटली कपटी व मूर्ख मंत्री यावेळी राम जेठमलानी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीकास्त्र सोडले. मला भाजपातून काढण्यात जेटली यांची मोठी भूमिका होती. मी स्पष्टपणे सत्य बोललो म्हणून मला भाजपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. सत्तेवर आल्यानंतर काळ्या पैशासंदर्भात जेटली संसदेत जशी उत्तरे देत आहेत, त्यावरुन ते कपटी व मूर्ख असल्याचे माझे मत झाले असल्याचे जेठमलानी म्हणाले.