शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

पाच ग्रा.पं.वर कॉँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

रेवराल/खात : मौदा तालुक्यात सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणुकीत पाच ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थीत गटाला यश आले आहे. २ ग्रा.पं.मध्ये भाजपा ...

रेवराल/खात : मौदा तालुक्यात सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणुकीत पाच ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थीत गटाला यश आले आहे. २ ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थीत गटाच्या सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाली आहे. यात धर्मापुरी, मोरगाव, मोहाळी, पानमारा व दुधाळा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत गटाच्या सरपंच, उपसरपंचांची निवड झाली आहे. सिरसोली ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थीत गटाचे विनोद गुलाबराव कारेमोरे सरपंच तर उपसपंचपदी प्रमिला देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. धर्मापुरी येथे सरपंचपद हे सर्वसाधारण (महिला) संवर्गाकरिता राखीव होते. येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत गटाच्या सविता गणराज भिवगडे यांचा विजय झाला. उपसरपंचपदी शैलेंद्र (बाबा) थोटे यांची बिनविरोध निवड झाली. मोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे काँग्रेस समर्थीत गटाचे नंदलाल परसराम पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत प्रवीण प्रभुदासजी नन्होरे यांना पाच तर सागर भर्रे यांना चार मते मिळाली. यात नन्होरे एका मताने विजयी झाले. मोहाळी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत गटाचे रवी चंद्रभान चकोले यांची सरपंच, तर दादाराव चिंतामण तिथले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. पानमारा ग्रामपंचायत येथे सरपंचपदी संजय देवा बारई व उपसरपंचपदी मधुमाला मनोज ठक्कर यांची निवड करण्यात आली.

नऊसदस्यीय दुधाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उमेश गंगाधर झलके, तर सुखदेव बाबुराव रोशनखेडे यांची उपसरपंचपदी निवड झाली. नरसाळा ग्रामपंचायतीमध्ये अजाब टेकाम यांची सरपंच तर सचिन राऊत यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. काँग्रेस गटाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व जि.प. सभापती तापेश्वर वैद्य यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.