शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आपमुळे कॉंग्रेसचा पराभव, दिग्विजय सिंह यांची टीका

By admin | Updated: April 26, 2017 21:05 IST

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आप सोबतच ईव्हीएम प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला. आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 -   दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी  आप सोबतच  ईव्हीएम  प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला.  आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा त्यांनी आरोप केला. सोबतच  ईव्हीएम प्रणालीवरदेखील त्यांनी जोरदार टीका केली.नागपुरात आले असता दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. दिल्ली महानगरपालिका निवडणूकांत ह्यआपह्णमुळे भाजपाला फायदा झाला व कॉंग्रेसचा पराभव झाला. गोव्यामध्ये  आपचा सफाया झाला. परिणामी कॉंग्रेस अव्वल स्थानी राहिली.  आपची स्थापनाच भाजपाला मदत करण्यासाठी झाली आहे, असे सिंह म्हणाले. निवडणूकांमध्ये  ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. यावेळी त्यांनी  ईव्हीएमवरदेखील भाष्य केले.  ईव्हीएमला  हॅक करणे कठीण नाही. विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातदेखील मतपत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेतली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.नक्षलग्रस्त भागात आदिवासींना सक्षम करावे

छत्तीसगडमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकाराला तेथील राज्य सरकारला जबाबदार ठरविले. या भागातील तेंदुपत्ता व दारुचे ठेकेदार हे नक्षलवादी व पोलीसांमधील दुवा आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकाळात तेथील ठेकेदारी पद्धती बंद झाली होती. मात्र भाजपाने ही पद्धत परत सुरू केली. जोपर्यंत ही प्रणाली सुरू आहे, तोपर्यंत नक्षलवाद संपुष्टात येऊ शकत नाही. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. नक्षलवादी व शासनाच्या मध्ये त्यांची कुचंबणा होते, असे दिग्विजय सिंह म्हणाले.