शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या बक्षिसावरून काँग्रेस-भाजप अध्यक्षांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी आतापासूनच शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी ...

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी आतापासूनच शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी नागपूरकर सत्तेचे बक्षीस कुणाला देतील, यावरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यात जुंपली आहे. हे दोन्ही नेते आमदार आहेत. शिवाय दोघेही माजी महापौर आहेत. महापालिकेच्या आखाड्यात आपले डाव फेकून एकमेकांना चित करण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांची टीम सोबत घेत आ. ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गेल्या १५ वर्षात महापालिकेत विविध घोटाळे झाले. विकास कामांच्या नुसत्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात काहीच साकारले नाही, अशी तोफ डागत भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच थेट लक्ष्य केले. ठाकरेंचा हा वार भाजपच्या जिव्हारी लागला. दुसऱ्याच दिवशी आ. प्रवीण दटके यांनी समोर येत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे आव्हान दिले. राजकारणासाठी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण शहराचा विकास का करू शकलो नाही, याचे आत्मपरीक्षणसुद्धा कराण्याचा सल्ला दटके यांनी प्रत्यक्षपणे ठाकरे यांना दिला.

दटके यांनी आक्रमक भूमिका घेताच ठाकरेही संतापले. भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करून काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे व वास्तविकता जनतेसमोर मांडावी, असे थेट आव्हान त्यांनी दटके यांना दिले. गडकरींच्या संकल्पनेतील एकाही प्रकल्पाला गती देण्यात दटके यांच्या नेतृत्वातील महापालिका कमी पडली. आता अपयशासाठी गडकरींची नाराजी ओढवून घ्यावी लागू नये म्हणून दटकेंची फटकेबाजी सुरू आहे, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला. महापौर म्हणून आपण महापालिका कशी चालविली हे भाजप नेत्यांना चांगलेच माहीत आहे. नवख्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांच्यावर केली.

ठाकरेंनी जारी केली २२ प्रश्नांची प्रश्नपत्रिका

- आ. विकास ठाकरे यांनी भाजपने शहर विकासाच्या केलेल्या विविध घोषणांचा संदर्भ देत २२ प्रश्नांची प्रश्नपत्रिकाच जारी केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे दटके यांनी जनतेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. लंडन स्ट्रीट योजना पूर्णत्वास का आली नाही, नागनदी प्रकल्प कुठे अडला, विधानसभानिहाय हॉस्पीिटल उभारण्याचे काय झाले, पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काय झाले, असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.