शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वासनिकांना साकडे

By admin | Updated: August 12, 2014 01:15 IST

अवघ्या चार महिन्यात मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात डॉ. अमोल देशमुख यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी,

अमोल देशमुख यांना उमेदवारी द्या : जागा जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा दावानागपूर : अवघ्या चार महिन्यात मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात डॉ. अमोल देशमुख यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खा. मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे. रामटेकची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडे डॉ. अमोल देशमुख यांच्याशिवाय दुसरा प्रभावी उमेदवार नाही, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी वासनिकांकडे व्यक्त केला. डॉ. अमोल देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुकुल वासनिक यांचे सक्रियतेने काम सांभाळले. त्यावेळी ते काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवीन होते. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन वासनिकांसाठी मते मागितली. त्यावेळी त्यांना परिचय द्यावा लागला. परंतु, अल्पावधीतच त्यांचे काम तसेच त्यांच्या हर्ड फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणारी आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा, कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद सर्कल मेळावे, गावभेटी लक्षात घेता मतदार व तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे डॉ. देशमुख यांची तरुण व सक्षम उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे.दरम्यान, मुकुल वासनिक यांची डॉ. अमोल देशमुख यांनी भेट घेतली. त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अनेकांनी डॉ. अमोल देशमुख यांना रामटेक मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी विनंती वासनिकांकडे केली. यावेळी काँग्रेस पक्षाने डॉ. अमोल देशमुखांना उमेदवारी दिल्यास रामटेकचा गड जिंकण्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी वासनिकांकडे व्यक्त केला. यावेळी रामटेक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण बन्सोड, प्रदेश काँग्रेस कमिटीचे संयोजक नामदेव कडुकर, रामटेक तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दीपक मोहोड, रवी चौरे, शिशुपाल यादव, माजी सभापती सुखराम लच्छोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, कैलाश राऊत, माजी सभापती रेखा कडुकर, पंचायत समिती सदस्य महेश मडावी, गणेश राऊत, गंगाधर काकडे, रमेश चैधरी, वीरेंद्र गजभिये, श्रीपाद भालेराव, प्रमोद बरबटे, युवक काँग्रेसचे शहवाज सिद्दिकी, जितेंद्र गिरडकर, प्रमोद काकडे, नदीम जमा, सागर सायरे, अनिता लोहे, कैलाश निघोट, मनोज जयस्वाल, राजेंद्र बागडे, कलावती तिवारी, भगवान राऊत, प्रकाश ढोरे, देवाजी दोडके, ज्ञानेश्वर बडवाईक, पुरुषोत्तम धोटे, मधुकर बेले, सदाशिव बर्वे यांच्यासह रामटेक परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)