शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत गोंधळ

By admin | Updated: October 26, 2015 02:44 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व धर्मादाय उपआयुक्तांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत...

शिक्षक वैतागले : मतदान न करता परतलेनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व धर्मादाय उपआयुक्तांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत नियोजनच नसल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. १८ हजार मतदारांसाठी केवळ ४ बुथवर मतदान घेण्यात आल्याने, मतदानासाठी शिक्षकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांचा त्रागा झाल्याने, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांशीही शिक्षकांच्या झटापटी झाल्या. त्यामुळे १ तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत संघटनेच्याच एका गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्टेटस्को दिला होता. ९ फेब्रुवारी २०१५ ला न्यायालयाने पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय उपआयुक्तांनी २५ आॅक्टोबरला संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला. त्यानुसार रविवारी धरमपेठ कन्या शाळेत मतदान घेण्यात आले. निवडणुकीत संपूर्ण विदर्भातून १८ हजार मतदार मतदान करणार होते. यासाठी धरमपेठ कन्या शाळेत चार बुथ ठेवण्यात आले होते. प्रत्येक बुथमध्ये प्रत्येकी तीन जिल्ह्यातील मतदारांचा समावेश करण्यात आला. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे मतदान प्रक्रियाच अडचणीत आली.