शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्यालाच अर्ज केला परत

By admin | Updated: December 29, 2014 02:40 IST

माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती टाळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात, ही नेहमीचीच ओरड आहे.

नागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती टाळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात, ही नेहमीचीच ओरड आहे. परंतु माहिती मागवण्यासाठी कार्यालयात पोस्टाने पाठविण्यात आलेला एखादा अर्ज सरसकट परत पाठविण्याचा प्रकारही आता नागपुरात सुरू झाला आहे. महापालिकेतील आरोग्य विभागाशी संबंधित एका प्रकरणावरून तर असेच दिसून आले आहे. कृष्णकुमार दाभोळकर हे शहरातील एक प्रसिद्ध माहिती अधिकारी कार्यकर्ते आहेत. तसेच आम आदमी पार्टीचे ते सक्रिय कार्यकर्तेसुद्धा आहेत. नागरिकांच्या हिताच्या संबंधात ते शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधून विविध प्रकारची माहिती मागवीत असतात. शहरातील आरोग्यविषयक समस्येबाबत त्यांनी महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला. यामध्ये मनपा आरोग्य उपसंचालकांना १६ सप्टेंबर रोजी घरोघरी कचरा उचलण्याबाबत, ७ सप्टेंबर रोजी कचरा जाळण्यास प्रतिबंध घालण्याबाबत, १७ नोव्हेंबर रोजी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने फेरीवाले, दुकानदारांना कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यात सक्ती करण्याबाबत आणि स्वच्छतेचे काम सांभाळणाऱ्या एजन्सीच्या सफाई कामगारांना डायऱ्या देण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु त्यांच्या एकाही निवेदनाला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपल्या पत्राबाबत नेमके काय झाले, याची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याचे ठरविले. त्यानुसार दाभोळकर यांनी आरोग्य विभागाकडे १७ डिसेंबर रोजी अर्ज सादर केला. हा अर्ज त्यांनी स्पीड पोस्टाने पाठविला. जन माहिती अधिकारी तथा झोनल अधिकारी (मुख्यालय) नागपूर महानगरपालिका सिव्हिल लाईन्स नागपूर या नावाने पाठविण्यात आलेला अर्ज दुसऱ्या दिवशी अर्जकर्त्याकडेच ‘रिफ्यूज’ म्हणून परत आला. माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)