नागपूर : सामािजक कार्यकर्त्या ॲड. जयश्री पाटील यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक सलोखा नष्ट करीत असल्याबद्दल बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. जयश्री पाटील या प्रसारमाध्यमातून सातत्याने मराठा समाजाबद्दल चिथावणीखोर आणि अपमानजनक भाषा वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलही जातीयवाचक भाषा वापरून त्यांनी उपमर्द केुला. यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. यामागे पाटील यांचा उद्देश सामाजिक सलोखा नष्ट करणे, भावना दुखविणे हाच दिसतो. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी आणि अटक करावी, अशी मागणी सकल मराठा विदर्भ प्रदेशचे कार्यकर्ते प्रा. प्रशांत भोसले, प्रा. विनय बाबर, प्रा. नरेंद्र मोहिते, प्रवीण (छोटू) शिंदे, प्रवीण माने, प्रा. नरेश तवले, सतीश शिंदे, राजेश निंबाळकर आदींनी केली आहे.