शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकुलसचिवपदाच्या निवड प्रक्रियेवरुन तापले वातावरणखर्च कुलगुरूंकडून वसूल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. डॉ. नीरज खटी यांचा ‘प्रोबेशन’ कालावधी पूर्ण झाला नसल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना होती. तरीदेखील त्यांची अगोदर निवड करणे व त्यानंतर त्यांना ‘लिन’ नाकारणे हा प्रक्रार करण्यात आला. यामुळे विद्यापीठाचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया गेला आहे. या निवड प्रक्रियेचा पूर्ण खर्च कुलगुरूंकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कुलसचिवपदाच्या निवडीसाठी विद्यापीठात सात महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. अखेर निवड समितीने डॉ. नीरज खटी यांची निवड केली. यानंतर प्रशासनावर राजकीय दबावदेखील आला. ‘लिन’ मिळू शकणार नसल्याने डॉ. खटी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुलगुरूंना डॉ. खटी यांच्यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती होती. अशास्थितीत निवड झाल्यानंतर हे मुद्दे कसे काय उपस्थित झाले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील मिश्रा यांनी या मुद्यावरून कुलगुरूंचीच तक्रार राज्यपालांकडे केली आहे. डॉ. नीरज खटी यांची ‘लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजीह्णमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर म्हणून निवड करण्यात आली. ‘लिन’संदर्भातील नियमांची डॉ. खटी व डॉ. काणे या दोघांनाही माहिती होती. तरीदेखील त्यांचा अर्ज छाननी समितीने ग्राह्य धरला व त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यानंतर त्यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खुद्द कुलगुरू यांनीच निवड केली. नियुक्तीनंतर डॉ. खटी यांना ‘लिनह्ण नाकारून ते पद त्यांनी स्वीकारू नये, अशी व्यवस्था केली. यातूनच हा प्रकार जाणीवपूर्वक झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च झाला. हा सर्व खर्च जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या निधीतून झाला आहे. त्यामुळे हा पैसा कुलगुरूंकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मिश्रा यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ