शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सुट्या पैशांसाठी कमिशनखोरी

By admin | Updated: November 12, 2016 02:44 IST

बहिणीच्या उपचारासाठी मध्य प्रदेशातून नागपूरच्या मेडिकलमध्ये आलेल्या अच्युतानंद शाहूला रुग्णालयाच्या परिसरातीलच

३५ टक्के कमिशन : रुग्णाच्या अगतिकतेचा घेत आहेत फायदानागपूर : बहिणीच्या उपचारासाठी मध्य प्रदेशातून नागपूरच्या मेडिकलमध्ये आलेल्या अच्युतानंद शाहूला रुग्णालयाच्या परिसरातीलच औषध विक्रेत्याने सुट्या नोटा नसल्याच्या कारणांवरून ५०० रुपयांची नोट नाकारली. हॉटेलमध्ये काही खाल्ल्यावर सुट्या नोटा मिळतील या आशेने तो एका हॉटेलात गेला असता तेथील मालकाने चक्क ३५ टक्के कमिशन कापून उर्वरित पैसे देण्याची भाषा वापरली. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या आॅटोरिक्षांपासून ते खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालक सुट्या पैशांसाठी अडलेल्या रुग्णाच्या अगतिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मंगळवारच्या रात्रीपासून अचानक बंद झाल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो गरीब रुग्णांना. बाहेरगावावरून मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना ५० ते १०० असे सुटे पैसे बाळगणे जोखमीचे ठरते, यामुळे अनेक जण १०००, ५०० रुपयांच्या नोटा घेऊनच येतात. परंतु अचानक या नोटा रद्द करण्यात आल्याने आणि मेडिकलने सुट्या नोटा नसल्याचे कारण पुढे करीत ५०० ते १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास असमर्थता दाखविल्याने शाहू सारखे अनेक रुग्ण अडचणीत आल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे आपली आपबिती सांगताना अच्युतानंद शाहू म्हणाला, बहिणीला पाठीच्या कणामध्ये क्षयरोग झाल्याने तिला मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्र. १७ मध्ये ती भरती आहे. बुधवारी डॉक्टरांनी बाहेरून औषध विकत घेऊन आणण्यासाठी चिट्टी दिली. मेडिकलच्या ड्रग स्टोअर्समध्ये गेलो असता त्यांनी सुट्या नोटा नसल्याचे सांगत ५०० रुपयाची नोट नाकारली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हॉटेलमध्ये काही खाल्ल्यावर सुट्या नोटा मिळतील या आशेवर २० रुपयांचा नाश्ता मागवित ५०० रुपयांची नोट दिली. परंतु त्याने नाकारली. ही नोट चलनात नसल्याचे सांगत ३५ टक्के कमिशनवर ३२० रुपये परत देतो असे म्हणून माझ्याच पैशांचा माझ्याशी सौदा केला, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या परिसरात उभे असलेले काही आॅटोचालक, अ‍ॅम्ब्युलन्स चालकही रुग्णाच्या अगतिकतेचा फायदा घेताना दिसून आले. सुटे पैसे देतो असे सांगून कमी अंतराच्या प्रवासाच्या भाड्यात दुपटीने वाढ केली होती, तर काही जण कमिशनची सर्रास भाषा बोलताना दिसून आले. (प्रतिनिधी)