शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाला फौजदारी कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: May 4, 2017 02:15 IST

भोसरी येथील जमीन प्रकरणाच्या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीसमोर एमआयडीसींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला

खडसेंच्या वकिलांचा युक्तिवाद : युक्तिवाद पूर्ण आता अहवालाची प्रतीक्षा नागपूर : भोसरी येथील जमीन प्रकरणाच्या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीसमोर एमआयडीसींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला आज खडसेंच्या वकिलांनी प्रतिउत्तर दिले. समितीला फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या वकिलांनी केला. दरम्यान आज युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे आता समिती काय अहवाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी सव्वादोन एकरचा भूखंड महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंनी आपल्या नातेवाईकांना स्वस्त दरात दिला. त्यासाठी शासकीय यंत्रणा व पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप खडसेंवर झाला. याच प्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. समितीने महसूल, एमआयडीसी व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची साक्ष नोंदविली. खडसेंचीही साक्ष नोंदविली. एमआयडीसीकडून बाजू मांडणारे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी ही जमीन एमआयडीसीची असल्याचा पुरावा दिला तर खडसेंच्या वकिलांनी ही जागा एमआयडीसीची नसल्याचा दावा केला. खडसेंनी आपल्याला या व्यवहाराची माहितीच नसल्याची साक्ष दिली तर व्यवहारामुळे शासनाचे कोणतेही नुकसान झाल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील एम.जी. भांगडे यांनी केला. जलतारे यांनी खडसेंचे सर्व दावे खोडून काढले. आज खडसेंचे वकील यांनी लेखी उत्तर देत समितीला फौजदारी कारवाई करण्याची शिफारस नसल्याचे म्हटले. २३ जून २०१६ ला समिती गठित करण्यात आली. समितीचा कारभार रविभवन येथील कॉटेज नंबर १३ येथून चालला. समितीला तीन दरम्यान आपला अहवाल द्यायचा होता. मात्र योग्यवेळी सर्व माहिती न मिळाल्याने समितीला १० महिन्याचा कार्यकाळ लागला. यादरम्यान समितीला चारदा मुदतवाढ देण्यात आली.(प्रतिनिधी)