शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चला, उपराजधानीला सुंदर करू या!

By admin | Updated: May 23, 2017 02:10 IST

आसपास दिसणारा कचरा व अस्वच्छता पाहिल्यानंतर जबाबदारी झटकून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची शहरामध्ये कमतरता नाही.

आय-क्लीन नागपूरचा पायंडा : आतापर्यंत ८६ भिंतींचे सौंदर्यीकरणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आसपास दिसणारा कचरा व अस्वच्छता पाहिल्यानंतर जबाबदारी झटकून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची शहरामध्ये कमतरता नाही. मात्र आपल्या शहरासाठी आपणही जबाबदारी घेऊन काही करू शकतो, असा विचार फार थोड्यांमध्ये असतो. अशाच काही समविचारी लोकांनी शहराच्या स्वच्छतेची एक मोहीमच सुरू केली आहे. ‘आय-क्लीन नागपूर’च्या माध्यमातून स्वच्छतेचे ध्येय घेतलेल्या या शहरातील ८६ सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी व सौंदर्यीकरण केले आहे.आय-क्लीन नागपूर ही संस्था किंवा अशासकीय संघटना (एनजीओ) नाही. केवळ नागपूरच्या स्वच्छतेचे ध्येय घेतलेल्या समविचारी लोकांचा ग्रुप आहे. यामध्ये उद्योजकांसह डॉक्टर्स, अभियंता, विद्यार्थी, गृहिणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणारे या ग्रुपचे सदस्य आहेत. यातील सदस्य असलेले संदीप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ नोव्हेंबर २०१४ पासून वंदना मुजूमदार यांच्या पुढाकारातून काही गृहिणींनी हा स्वच्छ शहराचा सामाजिक उपक्रम सुरू केला. आठवड्यातील सहा दिवस आपल्या क्षेत्रात काम करणारे ग्रुपचे व्हॉलेंटीयर रविवारी सुटीच्या दिवशी एकत्रित येतात व ठरलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुशोभीकरणाचे अभियान राबवितात. आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेसह तेथील सार्वजनिक भिंतींना आकर्षक रंगरंगोटी करून सौंदर्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात या ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील तब्बल ८६ भिंतींना सुशोभित करून बोलके रूप दिले आहे. असाच एक उपक्रम २०१३ पासून भोपाळमध्ये राबविल्या जात आहे. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन ही मोहीम नागपुरातही सुरू केली गेली. शहरातील अस्वच्छ व घाणेरडे असे ठिकाण निश्चित करायचे. स्वच्छतेच्या कामासाठी महापालिका किंवा जबाबदार शासकीय संस्थेकडून परवानगी घ्यायची दर रविवारी त्या ठिकाणच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम राबवायचा. रविवारी गोळा झालेले सदस्य आधी ठरलेल्या परिसरामधला कचरा साफ करतात व ठरलेली भिंतीही साफ करतात. त्यानंतर विशेषत: वारली कलेद्वारे त्या भिंतीला सुबक असे रंगविले जाते. या व्हॉलेंटीयरमध्ये काही चित्रकारांचा सहभाग झाल्याचे संदीप अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आय-क्लीनच्या ३० ते ३५ नियमित सदस्यांसह मौखिक प्रचार, फेसबुक व अन्य सोशल साईट्स च्या माध्यमातून १२० पेक्षा जास्त नवे व्हॉलेंटीयर उपक्रमाशी जुळल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. महापालिका प्रशासन, कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे.आय-क्लीन नागपूरची नवी दिशा‘आय-क्लीन’च्या माध्यमातून आतापर्यंत रेल्वे स्टेशन परिसर, एमपी बसस्थानक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एअर इंडिया चौक सिव्हिल लाईन्स, रामनगर चौक, इतवारी रेल्वे स्टेशन, मातृ सेवा संघाची भिंत, महाराजबाग रोड, सीताबर्डी पोलीस स्टेशन, कॉटन मार्केट भागाकडील रेल्वे स्टेशनची भिंत असे अनेक परिसर व भिंती या संघटनेने सुशोभित केल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या मैदानाचे सौंदर्यीकरण आय-क्लीनच्या सदस्यांनी केले आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा व जनजागृतीचा उपक्रमही संघटनेकडून राबविला जात आहे. अनेक मान्यवरांसह नुकतीच महापौर नंदा जिचकार यांनी आय-क्लीनच्या उपक्रमाला स्पॉट भेट देऊन कार्याची प्रशंसा केली. हे अभियान असेच अनवरत सुरू राहणार असल्याचा विश्वास संदीप अग्रवाल यांनी दिला.गेल्या अडीच वर्षांत या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्वच्छतेचा ध्येय बाळगलेले सदस्य सतत या मोहिमेशी जुळत आहेत. स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची गरज आहे व ते प्रत्येकाच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. आपल्या घरासोबत आसपासचा परिसरही स्वच्छ राहावा ही जाणीव असणे गरजेचे आहे. वारली पेंटिंगद्वारे भिंतीचे सौंदर्यीकरण मनाला समाधान देणारे आहे.- संदीप अग्रवाल, सदस्य आय-क्लीन नागपूर