शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा लोनसाठी येता येता झाले जोडीदार

By admin | Updated: February 14, 2017 02:05 IST

व्हॅलेंटाईन डेचा दिवस येताच विवाहित असो वा अविवाहित युवकांच्या मनात आपल्या प्रेयसी-प्रियकराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते.

त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे ठरलाय अभूतपूर्व : बँक कर्मचाऱ्यांनी लावून दिले लग्नराघवेंद्र तिवारी नागपूर व्हॅलेंटाईन डेचा दिवस येताच विवाहित असो वा अविवाहित युवकांच्या मनात आपल्या प्रेयसी-प्रियकराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते. असाच पहिला व्हॅलेंटाईन डे नीलेश आणि अर्चनासाठी आला असून ते नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. परंतु सर्वसामान्य जोडप्यांपेक्षा त्यांची कहाणी थोडी वेगळी आहे. अर्चनासाठी या व्हॅलेंटाईन डेला ‘सपना भी आप ही है, हकीकत भी आप है....बस आप आप ही मुझ मे समाए है’ हे गीत योग्य ठरते. कारण अर्चना पूर्णपणे नेत्रहीन आहे. तिचे स्वप्न प्रत्यक्षात तेव्हा साकारले जेव्हा तिच्या जीवनात तिच्या वयाच्या नीलेशची साथ तिला मिळाली. नीलेश भटसाठी हा व्हॅलेंटाईन डे अभूतपूर्व आणि सुखाचा आहे. त्यांच्यासाठी ‘आँखो का रंग ढुंढा हे हीरे तराशकर...दिल मे सजाएंगे ये रंग यू ही उम्र भर...मुश्किल से जिंदगी के रंग हाथ आये है’ हे गीत तंतोतंत खरे ठरते. नीलेशही केवळ २५ टक्केच हे जग पाहू शकतो. मूळचा तुमसर येथील रहिवासी असलेला नीलेश काही महिन्यांपूर्वी एका अशासकीय संस्थेत नेत्रहीन विद्यार्थ्यांना शिकवीत होता. कसेबसे आपले जीवन जगत असताना विवाह करण्याचे मनातही नव्हते. बिनाकी मंगळवारी येथील रहिवासी अर्चना पिंपळघरेही याच शाळेत येत होती. दोघांनाही स्वयंरोजगारासाठी कर्जाची गरज होती. त्यामुळे दोघांनीही बँक आॅफ इंडियाच्या शंकरनगर शाखेत अर्ज केला. दरम्यान दोघांची ओळख झाली. नीलेशने अर्चनाला पसंत केले. परंतु अर्चना नीलेशला एका आवाजाच्या रूपातच ओळखत होती. कर्जासाठी बँकेत येतायेताच दोघांची ओळख प्रेमात बदलली. परंतु दोघांजवळ विवाहासाठी काहीच साधन नव्हते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रकांत पोपरे यांच्या निर्देशावरून क्रेडिट मॅनेजर माधव लिमजे यांनी त्वरित कर्ज मंजूर केले; सोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचे गायत्री शक्तिपीठात लग्न लावून दिले. बँकेतर्फे त्यांना घरात गरजेचे असलेले साहित्यही देण्यात आले. सध्या दोघेही मानेवाडा-बेसा रोडवर सुखी जीवन जगत आहेत. बँक स्टाफ युनियनचे अध्यक्ष सत्यशिव रेवतकर यांनी सांगितले की, नीलेश भटने कर्ज घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय ते इमानदारीने करून कर्जाची परतफेड करीत आहेत.