शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

७५ लाभार्थ्यांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

नागपूर : देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. यात नव्या कोरोना विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. त्या धर्तीवर शनिवारी ...

नागपूर : देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. यात नव्या कोरोना विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. त्या धर्तीवर शनिवारी घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तयारीचा आढावा, ‘ड्राय रन’ महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. केटीनगर येथील मनपा आरोग्य केंद्र, डागा शासकीय स्त्री रुग्णालय व कामठी येथील ग्रामीण रुग्णालयातील केंद्रावर प्रत्येकी २५ असे एकूण ७५ लाभार्थ्यांवर लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. लसीकरण कार्यक्रम राबवताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.

तिन्ही केंद्रांवर सकाळी ९ वाजता ‘ड्राय रन’ला सुरुवात झाली. डागा रुग्णालयात आरोग्य सेवा मंडळ, नागपूरचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते. यावेळी अ‍ॅडिशनल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, डॉ. विनीता जैन, डॉ. संजय करपाके, डॉ. गजानन पारखे यांच्या मार्गदर्शनात सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान १० लाभार्थ्यांना बोलविण्यात आले होते. स्वागत कक्षात असलेल्या यादीत लाभार्थ्याच्या नावाची शहानिशा करून त्यांची थर्मल स्क्रीनिंग व पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. कोविड किंवा त्याबाबतची लक्षणे नसल्याची प्राथमिक खातरजमा केल्यावर त्यांना पुढील प्रतीक्षा कक्षात बसविण्यात आले. ‘को-विन’अ‍ॅपवर त्यांच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्राच्या माध्यमातून ओळख पटवून आवश्यक माहिती डाऊनलोड करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात आले. येथे लसीकरणासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होत्या. लस देण्याच्या रंगीत तालीमीनंतर पुन्हा ‘अ‍ॅप’वर लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली. नंतर संबंधित लाभार्थ्याला एका खोलीत बसवून ३० मिनिटांपर्यंत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. या कक्षात आवश्यक औषधांपासून ते ऑक्सिजनची सोय करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यात परिचारिका वैशाली राऊत, अपर्णा दिवे, पूजा नरवाडे, नीता मुरारकर, माधुरी थूल, आदी सहभागी झाल्या होत्या.

सकाळी १०.४५ वाजण्याच्या दरम्यान केटीनगर येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘ड्राय रन’चा आढावा घेतला. येथेही पहिल्या अर्ध्या तासात १० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. कामठी येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही भेट देत लसीकरणाच्या पूर्वीतयारीची पाहणी करीत काही आवश्यक सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यपालन अधिकारी योगश कुंभेजकर उपस्थित होते.

-‘ड्राय रन’मधून बारीकसारीक गोष्टींची चाचणी

‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, लसीकरण कार्यक्रम राबवताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ‘ड्राय रन’ घेण्यात आला. यात मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाईन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बारीकसारीक गोष्टींची चाचणी करण्यात आली. लसीकरण मोहिमेदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी फिडबॅक मिळवून त्यात योग्य ते बदल केला जाणार आहे.