शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कडाक्याच्या थंडीचा अद्याप जोर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

नागपूर : नागपुरातील डिसेंबर महिना सर्वाधिक थंडीचा असतो, हा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यंदा दरवर्षीसारखा थंडीचा जोर दिसला नाही. ...

नागपूर : नागपुरातील डिसेंबर महिना सर्वाधिक थंडीचा असतो, हा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यंदा दरवर्षीसारखा थंडीचा जोर दिसला नाही. २०२० च्या डिसेंबरमध्ये थंडीचा पारा फक्त पाच दिवसच १० अंशाखाली होता. २१ डिसेंबरला सर्वाधिक म्हणजे ८.४ अंश सेल्सिअस थंडी होती. तर या शतकात २०१८ मध्ये सर्वाधिक थंडीचा दिवस नोंदविला गेला होता. २९ डिसेंबर २०१८ रोजी किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात २०२० मध्ये अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता राहिली. परिणामत: आकाशात ढग दाटलेले राहिले, त्यामुळे पारा खालावला नाही. हवेचा रोखही उत्तरेकडून दक्षिणेकडे असल्याने पारा खाली आला नाही.

या काळात दाखल करण्यात आलेल्या नोंदीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात१५ डिसेंबरपर्यंत रात्री पारा सामान्यापेक्षा वर राहिला. १३ डिसेंबरला कमाल तापमान १९.५ अंशावर पोहचले होते. तर १४ आणि १५ डिसेंबरला १९.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात २० तारखेपासून पारा घटायला सुरुवात झाली. २० डिसेंबरला ८.६ अंश, २१ ला ८.४, २२ ला ८.६, २३ ला ९.२ आणि २४ डिसेंबरला ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. २५ डिसेंबरला पाऱ्यात वाढ झाली. या दिवशी १०.१ अंशाची नोंद झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी डिसेंबर महिन्यात १२ ते १५ दिवस कडाक्याची थंडी पडते. परंतु यंदा फक्त पाच दिवसच थंडी जाणवली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, डिसेंबरमध्ये रेकॉर्डब्रेक थंडी पडेल, असा होरा होता. मात्र मध्य भारतामधील सर्व अंदाज चुकीचे ठरले.

...

उष्णतेत पुढे

डिसेंबर महिन्यातील ३१ दिवसांपैकी २६ दिवसरात्र तापमान सामान्यापेक्षा अधिक राहीले. १३ डिसेंबरला रात्रीचे तापमान १९.५ अंशावर पोहचले होते. तर, १० डिसेंबरला दिवसरात्रीचे तापमान १८ अंशावर होते.

...

नागपुरातील सर्वाधिक थंडीचे दिवस

दिनांकतापमान

२९ डिसेंबर २०१८ - ३.४ अं.से.

२८ डिसेंबर २०१९ - ५.१ अं.से.

२१ डिसेंबर २०२० - ८.४ अं.से.

...

दृश्यता १ किलोमीटर

नववर्षाच्या प्रारंभी दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली होती. ढग आणि धुक्यांमुळे शहरात दृश्यता ५०० मीटर ते १ हजार मीटर होती. तर सामान्य दिवसात ती २ ते ४ किलोमीटर असते. शनिवारी किमान तापमान सामान्यापेक्षा दोन अंशाने अधिक १३.७ अंशावर पोहचले होते. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ८२ टक्के होती. ढगांमुळे सकाळी सूर्यदर्शन स्पष्टपणे होऊ शकले नाही. मात्र सायंकाळी आर्द्रतेत घट होऊन ५० टक्के नोंदविण्यात आली.

...