शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोब्राच्या विषाची तस्करी पकडली

By admin | Updated: March 22, 2017 02:58 IST

कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

दोघांना अटक : लाखोंचे विष अन् कार जप्त नागपूर : कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लाखोंचे विष आणि इनोव्हा कार जप्त केली. रोशन गिरीधर अमृतवार (वय १९) आणि गोपालसिंग रेनसिंग गौर (वय ३३)अशी या दोघांची नावे आहेत. रोशन तळोधी बाळापूर (नागभिड, जि. नागपूर) आणि गौर हुडकेश्वर (नागपूर) येथील रहिवासी आहे. साप आणि त्याच्या विषाची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटसोबत या दोघांचे संबंध असल्याचा संशय आहे. हिंगण्याच्या नोगा कंपनीजवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीव्ही ७३१९) बराच वेळेपासून उभी असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांना संशय आला. त्यांनी कारमध्ये बसलेल्या रोशन आणि गौर यांना विचारपूस करताच ते असंबंध उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात छोट्या बॉटल्स (टेस्ट ट्यूब बॉटल) मध्ये विशिष्ट द्रव भरून दिसले. त्याबाबत पोलिसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यात सापाचे विष असल्याचे त्यांनी सांगितले. हे विष विकायला आणल्याचीही आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे ठाणेदार सुनील महाडिक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक रमेश तायडे, हवलदार पप्पू यादव, दिनेश जुगनाके, सुशील श्रीवास्तव आणि आशिष दुवे यांनी या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची रात्रभर चौकशी केल्यानंतर प्रकरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांना वनाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. (प्रतिनिधी)