शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा आयातीचा पर्याय उपलब्ध

By admin | Updated: July 23, 2015 03:03 IST

कोल इंडिया कंपनी व इतर सहायक कंपन्यांकडून कोळशाची गरज पूर्ण होत नसल्यास वीज निर्मिती कंपन्यांना कोळसा आयातीचा पर्याय उपलब्ध आहे,

नागपूर : कोल इंडिया कंपनी व इतर सहायक कंपन्यांकडून कोळशाची गरज पूर्ण होत नसल्यास वीज निर्मिती कंपन्यांना कोळसा आयातीचा पर्याय उपलब्ध आहे, अशी माहिती केंद्रीय कोळसा व ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली आहे.कोळसा मंत्रालयाच्यावतीने अवर सचिव रविकुमार पिल्ली तर, ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय वीज प्राधिकरणचे संचालक राजेंद्र शर्मा यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महाजनको कंपनीतर्फे ११ फेब्रुवारी व ११ मार्च रोजी सादर केलेल्या उत्तरावर दोन्ही मंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘अशोका स्मोकलेस कोल कंपनी’च्या प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार केंद्र शासनातर्फे देशात २००७ पासून नवीन कोळसा धोरण लागू करण्यात आले आहे. त्यांतर्गत कोळसा मंत्रालयाने कोळशाची एकूण उपलब्धता व गरज लक्षात घेता १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१५ या काळात कार्यान्वित एकूण ७८ हजार मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्याचे निर्देश कोल इंडिया कंपनीला दिले आहेत. त्याकरिता वीज निर्मिती प्रकल्पासोबत इंधन पुरवठा करार करण्यास सांगण्यात आले आहे. या करारानुसार मागणी पूर्ण करणे शक्य होत नसल्यास कोल इंडिया कंपनी कोळसा आयात करून तो इच्छुक वीज निर्मिती प्रकल्पांना वाढीव दराने पुरवू शकते. याशिवाय वीज निर्मिती प्रकल्पांनाही कोळसा आयात करण्याचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे. कोळशाचा साठा व उत्पादन लक्षात घेता सर्वच क्षेत्रांना आवश्यक कोळसा पुरविणे शक्य होत नाही. यामुळे कोळसा पुरवठ्यासाठी वीज प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. नवीन धोरण, देशात तुटवडा असेल तरच कोळसा आयात करण्याची परवानगी देते, असे कोळसा मंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.वेकोलिद्वारे महाजनकोला केला जात असलेला दर्जाहीन कोळशाचा पुरवठा, महाजनकोकडून केली जात असलेली कोळशाची आयात, दर्जाहीन कोळशामुळे वीज प्रकल्प व वीज निर्मितीवर होणारा वाईट परिणाम इत्यादी गंभीर बाबींकडे लक्ष वेधणाऱ्या तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. अनिल वडपल्लिवार, श्रीकांत ढोलके व मृणाल घाटे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)