शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

सट्टारूपी आॅनलाईन लॉटरी बंद करा

By admin | Updated: May 7, 2016 03:03 IST

राज्यातील सट्टारूपी आॅनलाईन लॉटरी बंद करण्यात यावी, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

हायकोर्टात याचिका : नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा दावानागपूर : राज्यातील सट्टारूपी आॅनलाईन लॉटरी बंद करण्यात यावी, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आॅनलाईन लॉटरीमुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.चंदन त्रिवेदी असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते यवतमाळ येथील रहिवासी आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या गृह विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव व महसूल विभागाचे सचिव यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यासाठी सहा आठवड्याचा वेळ दिला. देशात ‘लॉटरी (नियमन) कायदा-१९९८’ व ‘लॉटरी (नियमन) नियम-२०१०’ लागू आहेत. यातंर्गत राज्यात लॉटरी व्यवसाय करता येतो. त्यासाठी राज्य शासनातर्फे संबंधित कंपनीकडून कर वसूल केला जातो. परंतु, कायदा व नियमांचे कुणीच पालन करीत नाही. राज्यात आॅनलाईन लॉटरीचा अवैधपणे व्यवसाय केला जात आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ एप्रिल २०१६ रोजी जाहीर केल्यानुसार २००७ ते २००९ या काळात आॅनलाईन लॉटरी कंपन्यांनी ९३३.१४ कोटी रुपयांचा कर बुडवला आहे. महाराष्ट्रात सिक्कीम, मिझोरम, गोवा, नागालॅन्ड इत्यादी राज्यांसह विविध खासगी कंपन्यांची आॅनलाईन लॉटरी केंदे्र कार्यरत आहेत. या केंद्रात सट्ट्याप्रमाणे लॉटरीची सोडत काढल्या जाते. प्रत्येक केंद्राला रोज किती सोडती काढायच्या हे ठरवून दिले आहे. परंतु, या नियमाचे पालन होत नाही. रोज ४०० ते ५०० सोडती काढल्या जातात. यामुळे आॅनलाईन लॉटरीचा अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा. अधिकृत आॅनलाईन लॉटरी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात यावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)