शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची किटकिट बंद करा

By admin | Updated: February 18, 2017 02:46 IST

काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत.

नितीन गडकरी : तब्बल १० सभांचा झंझावात नागपूर : काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत. ते पुन्हा धर्मांधता, जातीयवादाची टेप वाजवतील. मतदानाच्या माध्यमातून त्यांची ही किटकिट कायमची संपवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी शुक्रवारी तब्बल १० सभा घेत प्रचाराचा झंझावात केला. अत्रे ले-आऊट, मुंजे चौक, चोपडे लॉन, हिल टॉप, कपिलनगर चौक, जनता चौक, वैशाली नगर, शांतिनगर, अंबेनगर येथील सभांमध्ये गडकरी यांनी गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारने नागपूरसाठी केलेल्या कामाचा आलेख मांडला. या सभांना भाजपाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गेली १५ वर्र्षे आम्ही केवळ मिहानचे नावच ऐकत होतो. परंतु आम्ही सत्तेवर येताच मिहानला गती मिळाली. उद्योग आणले. नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला असून पाच वर्षात हा आकडा ५० हजारावर जाईल. नागपूर शहराला स्मार्ट शहर बनवण्याच्या दिशेने कामे सुरू आहेत. नऊ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. बुटीबोरी येथे लवकरच १८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. मिहानमध्ये १० हजार युवकांना रोजगार दिला आहे. येत्या दोन महिन्यात इलेक्ट्रिकवर ४०० टॅक्सी शहरात धावतील. बायो डिझेलवर चालणाऱ्या बसेस सुरू झाल्या आहेत. नागपुरातील ५० हजार गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी असायला हवा. त्यामुळे कामासाठी पैसे मागणाऱ्याला चोप द्या, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) सिमेंट रस्ते २०० वर्षांसाठी खड्डेमुक्त शहरात दोन हजार कोटी रुपयांचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे हे काम होत असून २०० वर्षे या रोडला खड्डे पडणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. ७५ ते ८० टक्के मतदान व्हावे सध्या मोबाईलचा जमाना आहे. कुणी मतदान केले कुणी नाही, याची लगेच माहिती मिळते. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान व्हावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये किमान ७० ते ८० टक्के मतदान व्हावे, असा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम लकवाछाप मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व विकास कामे बंद पाडली होती. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही, अशी टीका करीत गडकरी यांनी पुन्हा एकदा कुणाचेही नाव न घेता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम साधला.